Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

Monthly Archives: September, 2024

फॅक्ट चेक: मुंबईत मुस्लिमांच्या शक्तिप्रदर्शनाच्या दाव्यासह पूर्व तिमोरचा व्हिडिओ व्हायरल

मुंबईत मुस्लिमांच्या शक्तिप्रदर्शनाच्या दाव्यासह एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया यूजर्सच्या बरोबरीनेच काही अधिकृत माध्यमांनीही हा व्हिडीओ शेयर केला आहे.

Weekly Wrap: गणपती पेंडालमध्ये हृदयविकारातून वाचलेल्या पुजाऱ्यापासून माशाच्या पोटात गोळ्यांपर्यंत प्रमुख फॅक्टचेक

सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यातही सोशल मीडियावरील फेक दाव्यांचा पाऊस सुरूच राहिला. तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनात सर्व मुस्लिम आहेत, असा दावा करण्यात आला. टोल कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ भारतातील आहे, असा दावा करण्यात आला. निपाणी येथे माश्याच्या पोटात गोळ्या ठेवणाऱ्या एक व्यक्तीला पोलिसांनी पकडले, असा दावा करण्यात आला. प्रचंड खड्डे पडलेल्या आणि त्यातून वाहने उडणाऱ्या रस्त्याचा व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला. गणपतीच्या पंडालमध्ये हृदयविकाराच्या झटक्यातुन पुजारी चमत्कारिकरित्या बचावले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.

Fact Check: गणपती पंडालमध्ये हृदयविकाराच्या झटक्यातुन पुजारी चमत्कारिकरित्या बचावले? स्क्रिप्टेड व्हिडीओ खरा म्हणून व्हायरल

गणपती पंडालमध्ये हृदयविकाराच्या झटक्यातुन पुजारी चमत्कारिकरित्या बचावले असे सांगत अनेक सोशल मीडिया युजर एक व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यात कथितपणे गणपतीची पूजा केल्यानंतर एका पुजाऱ्याला हृदयविकाराचा झटका येत असल्याचे दाखवले जात आहे.

फॅक्ट चेक: चीनमधील तुटलेल्या रस्त्याचा जुना व्हिडिओ महाराष्ट्र म्हणून होतोय शेअर

देशाच्या अनेक भागात सततच्या पावसामुळे पाणी तुंबणे, पूर येणे अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातही सध्या पाऊस पडत आहे. दरम्यान, खड्डेमय रस्त्याने भरलेल्या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचे सांगत शेअर केले जात आहे.

निपाणीत माश्याच्या पोटात किडन्या खराब करणाऱ्या गोळ्या ठेवणाऱ्यास पकडले? खोटा आहे हा दावा

माश्याच्या पोटात गोळ्या ठेवणाऱ्या एक व्यक्तीला पोलिसांनी पकडले असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: टोल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ भारतातील नसून बांगलादेशातील आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुर्ता पायजमा आणि इस्लामिक टोपी घातलेले काही लोक टोल प्लाझाची तोडफोड करताना आणि टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अप्रत्यक्षपणे भारतातील असल्याचे शेअर केले जात आहे.

फॅक्ट चेक: तिरुपती लाडू वादाशी जोडून पाकिस्तानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची यादी जातीय दाव्यासह व्हायरल

तिरुपती लाडू वादाशी संबंध जोडणारा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, ज्यांच्या सॅम्पलमध्ये जनावरांची चरबी गोमांस आणि स्वयंपाकात वापरण्याची डुकराची चरबी असल्याची पुष्टी झाली आहे त्या तूप उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनात सर्व मुस्लिम आहेत.

Weekly Wrap: वंदे भारतची तोडफोड ते गणपतीला अटक पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्टचेक

सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडाही सोशल मीडियावरील फेक व्हायरल पोस्टमुळे गाजला. रेल्वेवर विविध मार्गानी जिहाद करणाऱ्यांची मजल आता वंदे भारतच्या काचा फोडण्यापर्यंत गेली आहे, असा दावा करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी गणेशमूर्तीला अटक केली, असा दावा झाला. बांगलादेशात गणपती बसविला तर मुस्लिमांनी तोडफोड केली, असा दावा करण्यात आला. हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

फॅक्ट चेक: हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर आपला विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले का? जाणून घ्या सत्य

हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असे सांगत राहुल गांधींच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: बांगलादेशात गणपती बसविला तर तोडफोड केली असे सांगत पाकिस्तानातील घटनेचा तीन वर्षे जुना व्हिडीओ व्हायरल

बांगलादेशात गणपती बसविला तर तिथल्या मुस्लिम लोकांनी बघा काय हाल केले असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read