Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: April, 2023

स्वामी विवेकानंदांचा दुर्मिळ व्हिडिओ? नाही, व्हायरल क्लिपमध्ये दिसणारी व्यक्ती परमहंस योगानंद

स्वामी विवेकानंदांचे दुर्मिळ फुटेज असे सांगून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांचे पक्षांतर: प्लस ठरणार की मायनस?

कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि तिकीट वाटप सुरू असतानाच भाजप नेत्यांची पक्षांतराला सुरुवात केली. अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना भाजपने तिकीट नाकारल्याने बंडखोरीचा उद्रेक झाला. त्यामुळे नेत्यांनी एक एक करून भाजपला राजीनामे दिले आहेत.

Fact Check: केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

अखेर नियतीने आपला फास आवळला आहे. दक्षिण आफ्रिका या देशातील प्रमुख शहर केप टाऊन हे शहर जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे. यामुळेच आता पाणी जपून वापरा. असा संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. उन्हाळ्याच्या झाला बसत असताना पाणी बचतीचा संदेश देताना पाठविला जाणारा हा संदेश अनेकजण पुढे पाठवीत आहेत.

Weekly Wrap: आरएसएस चा मुस्लिम तरुणींबद्दलचा फतवा पासून मोदी म्हणाले गरिबांना स्वप्ने दाखवा आणि अंबानींनी वाटले पैसे पर्यंत आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

हा आठवडाही सोशल मीडियावरील बनावट पोस्टमुळे गाजला. आरएसएस ने मुस्लिम तरुणींना फशी पाडण्याचे आवाहन केले असे सांगणारा एक दावा करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी गरिबांना फक्त स्वप्ने दाखवून राज्य करा असे म्हटल्याचे सांगत एक पोस्ट व्हायरल झाली. अंबानींनी एका कार्यक्रमात टिश्यू पेपर ऐवजी पाचशे रुपयांच्या नोटा वाटल्याचा दावा करण्यात आला. काही मोबाईल क्रमांकांवर फोन केल्यास गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळेल आणि लाडली फौंडेशन मुलींच्या लग्नासाठी पैसे देईल असे सांगणारा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्ट मध्ये पाहता येतील.

Fact Check: पंतप्रधान मोदींचा अर्धा व्हिडीओ दिशाभूल करीत व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान म्हणत आहेत, “गरिबांना फक्त स्वप्ने दाखवा, खोटे बोला. आपापसात लढवा आणि राज्य करा." हे शेअर करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेच काम असल्याचे सांगितले जात आहे.

Fact Check: मुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवा असे आवाहन आरएसएस ने केलेय? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

आरएसएस ने हिंदू तरुणांना उद्देशून लिहिलेले पत्र म्हणून एक दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. हिंदू तरुणांनो मुस्लिम मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवा, त्यांच्याशी शारिरिक संबंध बनवा आणि त्यांच्याशी विवाह करा. याकामासाठी संघटनेकडून आपल्याला ५ लाख रुपये दिले जातील असे आवाहन आरएसएस ने या पत्राद्वारे जाहीररीत्या केले असल्याचा आरोप या दाव्याद्वारे होऊ लागला आहे. व्हाट्सअप वर तसेच ट्विटर वर हे पत्र व्हायरल झाले आहे.

Fact Check: गरीब विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारा आणि गरिबाला मुलीच्या लग्नासाठी मदत करणारा संदेश खरा आहे? जाणून घ्या सत्य

शाळांच्या परीक्षा संपल्या, निकाल लागताहेत आणि सुट्ट्या पडत असतानाच नव्या शिक्षणाचे वेध विद्यार्थी आणि पालकांना लागत आहेत. याचवेळी एक संदेश मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून व्हायरल होणार दावा गरीब विद्यार्थ्यांना मदत मिळण्याची आशा निर्माण करीत आहे. याचबरोबरीने लग्नसराईच्या निमित्ताने गोर गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत मिळण्याची स्वप्ने दाखवीत आहे. या मेसेज च्या माध्यमातून होणार दावा मोठ्याप्रमाणात लोक फॉरवर्ड करीत असल्याचे आम्हाला दिसून आले.

Fact Check: अंबानींनी NMACC कार्यक्रमात टिश्यू पेपर्सऐवजी ₹500 च्या नोटा दिल्या? जाणून घ्या व्हायरल इमेजमागील सत्य

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटनाच्या आलिशान कार्यक्रमातील व्हिज्युअल्सने नेटिझन्सची झोप उडविली. चलनी नोटांनी सजवलेल्या मिठाईच्या प्लेटची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शेअर केली जात आहे. छायाचित्रकार जर्मन लार्किनच्या इंस्टाग्राम स्टोरीतील हे स्क्रीनग्रॅब, “₹500 च्या नोटा” असलेली डिश दाखवते. अनेकांनी ही अतिशयोक्ती पाहून स्मायली दिली, तर इतर अनेकांनी ते चित्र खरे असल्याचे मानले. तथापि, ते चित्र मिम सारखे शेयर केले जात होते. अनेक युजर्सना त्या डिश मधील त्या चलनी नोटा खऱ्याच वाटल्या

Weekly Wrap: हृदयविकारावरील रेमेडी, मोदींची श्रीमंत भावंडे, बुर्ज खलिफावर श्रीराम, आंबा खावून पिऊ नका कोल्डड्रिंक तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक खोट्या दाव्यान्नी सुळसुळाट केला. हृदयविकारावरील एक रेमेडी वापरल्यास बायपास, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी ची गरज नसल्याचा दावा करण्यात आला. रामनवमीच्या निमित्ताने बुर्ज खलिफावर श्री रामाची प्रतिमा झळकाविण्यात आली असा एक दावा झाला. आंबा खाऊन त्यावर कोल्डड्रिंक पिल्यास मृत्यू होतो तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळे त्यांची सख्खी व चुलत भावंडे श्रीमंत झाली आहेत. असे दावे पाहायला मिळाले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्ट मध्ये पाहता येतील.

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा व्हायरल मेसेज वाचला का? त्यातील मजकूर काल्पनिक आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणारा एक व्हायरल मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे. पंतप्रधानांच्या प्रभावामुळे त्यांच्या सख्ख्या आणि चुलत भावंडांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. त्यांना सन्मानाची पदे मिळाली आहेत. तसेच काहींच्या नावावर मोठे उत्पन्न मिळविणारे व्यवसाय आहेत. असे हा दावा सांगतो. "मोदी सरकार मध्ये हिम्मत असेल तर, यांच्यावर ED ची चौकशी लावणार का?" असा प्रश्नही युजर्स या दाव्याच्या माध्यमातून व्यक्त करीत आहेत.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read