Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

Monthly Archives: April, 2023

Fact Check: ही रेमेडी केल्यावर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास ची गरज नाही असा दावा वाचनात आलाय? जाणून घ्या सत्य

व्हाट्सअप विद्यापीठातून अनेक आरोग्यविषयक सल्ले आणि मार्गदर्शन दिले जाते हे आपण पाहतोच. काही सल्ल्यांना आगापिछा राहत नाही. तर काही सल्ले विशिष्ट डॉक्टरांचे नाव देऊन दिले जातात. असाच एक सल्ला सध्या मलाया विद्यापीठाच्या डॉ. विकिनेश्वरी यांनी दिला असल्याचे सांगून व्हाट्सअप वर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सांगितलेली रेमेडी जर अंमलात आणली तर हृदयरोग्याला अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास सारख्या शस्त्रक्रिया उपचारांची गरजच पडणार नाही. असे सांगितले जात आहे.

Fact Check: आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्यास होतो मृत्यू? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य काय आहे

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा आणि शीतपेयांच्या सध्या उन्हाळ्यात चलती आहे. याच दरम्यान एक दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आपणही आंबा खाऊन कोल्डड्रिंक पिणे टाळावे अन्यथा मृत्यूचा सामना करावा लागेल असे हा दावा सांगतो आहे.

Fact Check: बुर्ज खलिफा प्रभू रामाच्या प्रतिमेने उजळला? नाही, व्हायरल फोटो एडिटेड आहे

दुबईच्या प्रतिष्ठित बुर्ज खलिफावर प्रभू रामाची प्रतिमा प्रदर्शित होत असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 30 मार्च 2023 रोजी असलेल्या रामनवमीच्या निमित्ताने लाइट शो करण्यात आल्याचा दावा अनेक युजर्सनी केला आहे.

Weekly Wrap: युपीआय पेमेन्टवर वाढीव कर, गोव्यात बनावट काजू , राहुल गांधींनी हटविले सावरकरांवरील ट्विट्स तसेच इतर प्रमुख फॅक्ट चेक

गेल्या आठवड्यात खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरविणारे दावे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदार पदावरून अपात्र ठरविले गेल्यानंतर त्यांनीच अपात्रता विरोधी विधेयक फाडले होते. असा दावा करण्यात आला. राहुल गांधींनी सावरकरांच्या नातवाच्या इशाऱ्यानंतर त्यांच्याबद्दलचे सर्व ट्विट्स रद्द केले असाही दावा झाला. गोवा राज्यात बनावट काजू तयार केले जातात असे सांगत एक व्हिडीओ व्हायरल झाला. युपीआय पेमेंट करताना ₹2000 च्या खरेदीवर वाढीव कर भरावा लागणार असा दावा करण्यात आला. एका जुन्या घटनेचा संदर्भ घेऊन तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्थांवर आयटी ने छापा मारल्याचा दावा करण्यात आला. या दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येईल.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read