Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

Yearly Archives: 2024

Weekly Wrap: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरील दाव्यांचे फॅक्टचेक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असंख्य दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे, असा दावा झाला. MVA नेत्या सुप्रिया सुळे, नेते नाना पटोले आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या 2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणाशी संबंधित बिटकॉइन्सबद्दलच्या ऑडिओ नोट्स, असा दावा करण्यात आला. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 1992 च्या दंगलीत पक्षाच्या सहभागाबद्दल मुस्लिम नेत्यांची माफी मागितली, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे, असा दावा करण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांची निवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६२ वर्षे करण्यात आली, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र निवडणुकीनंतर टोल टॅक्स आणि दुधाचे दर वाढले आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

फॅक्ट चेक: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर टोल टॅक्स आणि दुधाचे दर वाढले? सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याद्वारे महाराष्ट्र निवडणुकीनंतर टोल टॅक्स आणि दुधाचे दर वाढल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट चेक: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे का? नाही, हा दावा खोटा आहे

भारत सरकारच्या आदेशानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्यात आल्याचा दावा करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तपासाअंती आम्हाला आढळून आले की हा दावा खोटा आहे.

1992 च्या दंगलीबद्दल उद्धव ठाकरेंनी मुस्लिम नेत्यांची माफी मागितल्याचा दावा करणारे व्हायरल वृत्तपत्र कात्रण खोटे आहे

शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 1992 च्या दंगलीत पक्षाच्या सहभागाबद्दल मुस्लिम नेत्यांची माफी मागितली, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

अवघा महाराष्ट्र ‘बिटकॉइन एक्सपोज’ वरून राजकीय वादाचा साक्षीदार बनताना, व्हायरल ऑडिओ नोट्सबद्दल आम्हाला हे सापडले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी, पुण्यातील माजी-आयपीएस अधिकारी, रवींद्रनाथ पाटील यांनी 2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात NCP-SP नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांच्यावर आरोप करून राजकीय वादळ निर्माण केले.

फॅक्ट चेक: महाराष्ट्राच्या निवडणुकीत बिटकॉइन वादाशी जोडत सुप्रिया सुळे यांचा सांगत व्हायरल ऑडिओ एआय जनरेटेड आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी बिटकॉइन घोटाळ्यातील पैसा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वापरला जात असून त्यात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप केला.

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट

"१९९२ च्या दंगलीतील सहभाग ही चूकच, माफ करा - उद्धव ठाकरे" अशा शीर्षकाच्या सोशल मीडियावरील पोस्टने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ माजविली. "बाळासाहेबांनी ज्या गोष्टीचा अभिमान बाळगला त्याच गोष्टीसाठी आज उ.बा.ठा. दिलगिरी व्यक्त करत आहे. मत मिळवण्यासाठी अजून किती खालची पातळी गाठणार?" तसेच "महाराष्ट्रातील हिंदूंच्या आयुष्यातील हाच काळा दिवस आहे." अशा कॅप्शनखाली प्रचंड व्हायरल झालेल्या पोस्टने तितकाच प्रचंड धुमाकूळ घातला. याच १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट आपण या एक्सप्लेनेरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

फॅक्ट चेक: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डचा दावा? जाणून घ्या सत्य काय आहे

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे, असे हा दावा सांगतो. विशेष म्हणजे राजकीय दृष्टया आणि प्रचाराचा एक भाग बनविण्यासाठीचे नरेटिव्ह म्हणून हा दावा वापरला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: ओम बिर्ला यांची मुलगी अंजली हिने मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केले? नाही, व्हायरल दावा खोटा आहे

12 नोव्हेंबर 2024 रोजी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिने राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या एका कार्यक्रमात तिचा दीर्घकाळचा मित्र अनिश राजानीसोबत लग्नगाठ बांधली.

फॅक्ट चेक: आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले नाहीत

विधानसभा निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. यावेळची निवडणूक अनेक नरेटिव्हसवर गाजते आहे. याच क्रमाने शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दलचा दावा केला जात आहे. आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले. असे हा दावा सांगतो.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read