Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: March, 2024

Weekly Wrap: फोर्ब्सच्या यादीत राहुल गांधी पासून गुडमॉर्निंग मेसेजवर जीएसटी पर्यंत प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडाही सोशल मीडियावरील फेक क्लेम्समुळे चर्चेत राहिला. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधी सातव्या क्रमांकावर असल्याचा दावा करण्यात आला. गुड मॉर्निंग मेसेजवर 18% पर्यंत जीएसटी आकारला जाणार, असा दावा झाला. विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत असताना असे सांगत एक इमेज व्हायरल करण्यात आली. कॅमेऱ्यावर मुलांचे अपहरण दाखवणारा चोरून काढलेला व्हिडीओ असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: कॅमेऱ्यावर मुलांचे अपहरण दाखवणारा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे

कॅमेऱ्यावर मुलांचे अपहरण दाखवणारा व्हिडिओ असे सांगत मुखवटाधारी माणसे मुलांची खरेदी आणि विक्रीची किंमत यावर चर्चा करतानाचा 15 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक बालकांना अपहृत करण्यात आल्याचे वास्तविक फुटेज असल्याचा दावा केला आहे.

Fact Check: विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता का? नाही, व्हायरल चित्र एडिटेड आहे

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छायाचित्रात ते त्यांच्या मोबाईलकडे पाहत असून फोन स्क्रीनवर राहुल गांधी यांचे छायाचित्र दिसत आहे. या छायाचित्रासह सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत आहे.

Fact Check: गुड मॉर्निंग मेसेजवर 18% पर्यंत जीएसटी आकारला जाणार नाही, जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

गुड मॉर्निंग मेसेजवर 18% पर्यंत जीएसटी आकारला जाणार आहे, असे सांगत एका बातमीचे कात्रण वापरून दावा केला जात आहे.

फोर्ब्सच्या सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधी सातव्या क्रमांकावर आहेत? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधी सातव्या क्रमांकावर असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

Weekly Wrap: ममता बॅनर्जींना झालेल्या जखमेपासून लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांपर्यंत प्रमुख फॅक्टचेक

नाशिकमध्ये मंचावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिला, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार आहे, असा दावा झाला. कोलाजमध्ये असलेली छायाचित्रे ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील आहेत, असा दावा झाला. मराठी तरुणाईने ही संधी सोडू नका, भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत. असा दावा करण्यात आला. नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी झाली, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जमलेल्या गर्दीचा म्हणून सांगत दौसाचा जुना व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून, नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जमलेली गर्दी असे वर्णन केले जात आहे.

Fact Check: भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत? खोटा आहे हा मेसेज

भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत, मराठी तरुणाईने ही संधी सोडू नका. असे सांगणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे. आम्हाला हा मेसेज व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात घिरट्या घालत असल्याचे दिसून आले.

Fact Check: ममता बॅनर्जी यांचा जुना फोटो नुकत्याच झालेल्या अपघाताशी संबंधित असल्याचा खोटा दावा करीत व्हायरल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दोन छायाचित्रांचा कोलाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कोलाज त्यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाताशी जोडून शेअर केला जात आहे आणि असा दावा केला जात आहे की ती दुखापत खोटी आहे.

Fact Check: महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार हा दावा खोटा

महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार आहे, असे सांगणारा एक दावा सोशल मीडियावर व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आला आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read