Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

Monthly Archives: March, 2024

Fact Check: नाशिकमध्ये मंचावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिला? नाही, खोटा दावा व्हायरल

राहुल गांधींच्या जाहीर सभेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती विठ्ठलाची मूर्ती घेऊन त्यांच्यासमोर उभी असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने भेट स्वरूपात आणलेली भगवान विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Weekly Wrap: जिओचे फ्री रिचार्ज, प्रत्येक भारतीयाला 500 रुपये ते जनविश्वास रॅलीची छायाचित्रे पर्यंत या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या जनविश्वास रॅलीत जमलेल्या गर्दीची छायाचित्रे असे सांगत काही छायाचित्रे व्हायरल करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या केंद्र सरकारवर टीका केली आहे, असा दावा करण्यात आला. चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते, असा दावा झाला. मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना ८४ दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे, असा दावा करण्यात आला. मोदी सरकार सर्व नागरिकांना दररोज 500 रुपये देत आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत मोदी सरकार सर्व नागरिकांना दररोज 500 रुपये देत आहे का? येथे जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

पीएम विश्वकर्मा योजनेबाबत, सोशल मीडियावर दावा केला जात आहे की मोदी सरकार सर्व लोकांना दररोज 500 रुपये देत आहे. तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला असे आढळून आले की पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपारिक कारागीर आणि कारागिरांसाठी आहे आणि त्याअंतर्गत प्रशिक्षण घेत असताना पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांना दररोज 500 रुपये दिले जातात.

Fact Check: मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना दिले जातेय मोफत रिचार्ज? खोटा आहे हा दावा

मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना दिले जातेय मोफत रिचार्ज असे सांगत एक दावा सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

Fact Check: चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते? जाणून घ्या सत्य

चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांची छायाचित्रे पाठवल्यास सरकार पाचशे रुपये देते. असे सांगणारा एका दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. एका स्क्रीनशॉटचा वापर करून हा दावा केला जात आहे.

Fact Check: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर केली नाही टीका, जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

नितीन गडकरी एका व्हिडिओमध्ये मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मोदी सरकार ने 10 वर्ष में क्या किया- सुन लीजिए नितिन गडकरी से.”

Fact Check: 2017 ची छायाचित्रे पाटणा येथील गांधी मैदानावर आयोजित ‘जनविश्वास रॅली’ म्हणून करण्यात आली शेअर

3 मार्च 2024 रोजी पाटणा येथे गांधी मैदानावर झालेल्या जनविश्वास रॅलीत जमलेल्या गर्दीची असे सांगत दोन छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की पाटणा येथील गांधी मैदानाचे हे चित्र सात वर्षे जुने आहे आणि ते आजचे म्हणून व्हायरल करण्यात आले आहे.

Weekly Wrap: भारतीय पोस्टाची सबसिडी योजना, अमित शहांचे बेड्या घातलेले पोस्टर्स ते डॉक्टरला मुस्लिमाची मारहाण पर्यंतचे प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही अनेक दावे व्हायरल झाले. तामिळनाडूत लहान मुलांच्या मृतदेहांनी भरलेला कंटेनर सापडला असून मुलांच्या अवयवांचा व्यापार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असा दावा करण्यात आला. अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले, असा दावा झाला. नाशिकमधील डॉक्टर कैलाश राठी यांच्यावर मुस्लिम व्यक्तीने हल्ला केला, असा दावा झाला. लिंकवर क्लिक करा आणि भारतीय पोस्ट सबसिडी योजनेचा लाभ घ्या, असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: तुम्हालाही भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक आली आहे? हा दिशाभूल करण्याचा एक प्रकार

भारतीय पोस्ट सबसिडी योजनेची लिंक असल्याचे सांगून या योजनेचा लाभ घ्या. असे सांगणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read