Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

Monthly Archives: November, 2024

अवघा महाराष्ट्र ‘बिटकॉइन एक्सपोज’ वरून राजकीय वादाचा साक्षीदार बनताना, व्हायरल ऑडिओ नोट्सबद्दल आम्हाला हे सापडले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी, पुण्यातील माजी-आयपीएस अधिकारी, रवींद्रनाथ पाटील यांनी 2018 च्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात NCP-SP नेत्या सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांच्यावर आरोप करून राजकीय वादळ निर्माण केले.

फॅक्ट चेक: महाराष्ट्राच्या निवडणुकीत बिटकॉइन वादाशी जोडत सुप्रिया सुळे यांचा सांगत व्हायरल ऑडिओ एआय जनरेटेड आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी बिटकॉइन घोटाळ्यातील पैसा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वापरला जात असून त्यात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप केला.

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट

"१९९२ च्या दंगलीतील सहभाग ही चूकच, माफ करा - उद्धव ठाकरे" अशा शीर्षकाच्या सोशल मीडियावरील पोस्टने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ माजविली. "बाळासाहेबांनी ज्या गोष्टीचा अभिमान बाळगला त्याच गोष्टीसाठी आज उ.बा.ठा. दिलगिरी व्यक्त करत आहे. मत मिळवण्यासाठी अजून किती खालची पातळी गाठणार?" तसेच "महाराष्ट्रातील हिंदूंच्या आयुष्यातील हाच काळा दिवस आहे." अशा कॅप्शनखाली प्रचंड व्हायरल झालेल्या पोस्टने तितकाच प्रचंड धुमाकूळ घातला. याच १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट आपण या एक्सप्लेनेरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

फॅक्ट चेक: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डचा दावा? जाणून घ्या सत्य काय आहे

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे, असे हा दावा सांगतो. विशेष म्हणजे राजकीय दृष्टया आणि प्रचाराचा एक भाग बनविण्यासाठीचे नरेटिव्ह म्हणून हा दावा वापरला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: ओम बिर्ला यांची मुलगी अंजली हिने मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केले? नाही, व्हायरल दावा खोटा आहे

12 नोव्हेंबर 2024 रोजी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिने राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या एका कार्यक्रमात तिचा दीर्घकाळचा मित्र अनिश राजानीसोबत लग्नगाठ बांधली.

फॅक्ट चेक: आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले नाहीत

विधानसभा निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. यावेळची निवडणूक अनेक नरेटिव्हसवर गाजते आहे. याच क्रमाने शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दलचा दावा केला जात आहे. आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले. असे हा दावा सांगतो.

फॅक्ट चेक: भाजपा युतीला मतदान द्या, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

भाजपा युतीला मतदान करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले असल्याचे सांगणारा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझरवर स्वार होऊन महाराष्ट्रात प्रचार केला?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या वेशात एक व्यक्ती जेसीबीवर उभा आहे. योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझरवर स्वार होऊन महाराष्ट्रात प्रचार केल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Weekly Wrap: विधानसभा निवडणुकीला जोडून व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक

२० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीला जोडून असंख्य दावे व्हायरल झाले. महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय, असा दावा झाला. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे सरकार दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल. असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, असा दावा झाला. काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा काढण्यात आलाय, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

फॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरचा आहे

अतिशय सुंदर पद्धतीने इमारतीतून श्रीराम घोष करीत महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली असे सांगत एका इमारतीमधून श्रीराम जयघोष करणाऱ्या नागरिकांचा व्हिडीओ शेयर केला जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read