Wednesday, January 8, 2025
Wednesday, January 8, 2025

Monthly Archives: December, 2024

Weekly Wrap: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा सुळसुळाट सुरूच राहिला. स्टेजवर वरासह आक्षेपार्ह कपड्यांमध्ये असलेले वधूचे छायाचित्र खरे असल्याचा दावा करून व्हायरल करण्यात आले. बांगलादेशात अतिरेक्यांनी काली माता मंदिर पाडल्याचा दावा करण्यात आला. न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे, असा दावा करण्यात आला. अमित शाह, अजित डोवाल आणि गौतम अदानी यांच्या प्रवेशावर अमेरिका आणि कॅनडाने बंदी घातली आहे, असा दावा झाला.

फॅक्ट चेक: ‘लोकसत्ता’ चा लोगो वापरत उदय सामंत यांच्या नावे व्हायरल न्यूजकार्ड एडिटेड आहे

शिंदे या खांदेबदलावरून नाराज असल्याच्या अनेक बातम्या आठवडाभर रंगत होत्या. शपथविधी झाला तरी यासंदर्भातील अनेक पोस्ट फिरत असून यातच 'लोकसत्ता' चा लोगो वापरत उदय सामंत यांच्या नावे व्हायरल न्यूजकार्ड चर्चेत आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये काली माता मूर्ती विसर्जनाचा व्हिडिओ बांगलादेशचा असल्याचा खोटा जातीय दावा करीत व्हायरल

सोशल मीडियावर दोन मिनिटांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक जमाव काली माँची मूर्ती पाडवताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, बांगलादेशातील मुस्लिमांकडून काली मातेचे मंदिर पाडले जात आहे.

अँकर श्वेता सिंगचा डायबिटीजवर घरगुती उपचार सांगतानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल

न्यूज अँकर श्वेता सिंग सात सेकंदांच्या घरगुती उपायाने मधुमेहावरील उपचार समजावून सांगत आहे.

अमित शाह, अजित डोवाल आणि गौतम अदानी यांच्या प्रवेशावर अमेरिका आणि कॅनडाने बंदी घातलेली नाही, खोटा दावा व्हायरल

सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडाने भारताचे गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रवेशावर बंदी घातली असल्याचे बोलले जात आहे.

फॅक्ट चेक: स्टेजवर वरासह दिसणारे वधूचे चित्र AI जनरेटेड आहे

एका लग्नसोहळ्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्रात वधू पारंपारिक पोशाखाऐवजी बिकिनी परिधान करताना दिसत आहे. हे छायाचित्र जातीयवादी दाव्याने सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. तथापि, तपासणी केल्यावर आम्हाला आढळले की हे चित्र AI व्युत्पन्न आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read