Tuesday, November 26, 2024
Tuesday, November 26, 2024

Yearly Archives: 2024

Weekly Wrap: नीट जिहाद, समुद्री गायीचे दर्शन, वारकऱ्यांवर हल्ला आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही अनेक फेक दावे व्हायरल झाले. व्हायरल इमेजमध्ये प्रतिमा NEET-UG पेपर लीक प्रकरणाचे लाभार्थी असून ते सर्व मुस्लिम विद्यार्थी आहेत, अशा प्रकारे “NEET जिहाद” झाल्याचे सिद्ध होते. असा दावा करण्यात आला. पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी हल्ला केला, असा दावा करण्यात आला. FASTag मधून पैसे काढण्याची नवी पद्धत आली असून त्याद्वारे वाहनचालकांची लूट सुरु आहे, असा दावा करण्यात आला. अंबानी विवाह सोहळ्याचे स्ट्रीमिंग हक्क हॉटस्टारला मिळाले असा दावा करण्यात आला. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्री गाय आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

समुद्री गाय म्हणून व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात AI-जनरेटेड आहे

व्हिडिओमध्ये नव्याने सापडलेल्या प्राण्याची प्रजाती असून, त्याला गाईचे तोंड असलेला सील किंवा समुद्री गाय असे म्हटले जात आहे.

अंबानी विवाह सोहळ्याचे स्ट्रीमिंग हक्क हॉटस्टारला मिळाले असे सांगणारे आर्टिकल व्यंगात्मक

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांनी स्वतः आयोजित केलेल्या लिलावात अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा पराभव ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी स्ट्रीमिंग हक्क मिळवले.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट संगीत: जस्टिन बीबरने ‘कुक्कड कमल दा’ बॉलीवूड हिटवर डान्स केला का?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात परफॉर्म करताना पॉप स्टार जस्टिन बीबर “कुक्कड कमल दा” या हिट बॉलीवूड गाण्यावर नाचत असल्याचा दावा करत अनेक सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ फिरवत आहेत.

Fact Check: ‘FASTag Scam’ दर्शविणारा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे, अथोराइज नसलेल्या डिव्हाइसमधून आर्थिक व्यवहार होत नसल्याचे NETC चे स्पष्टीकरण

FASTags स्कॅन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन मालकांकडून पैसे लुटण्याची नवीन पद्धत आली आहे असा आरोप करणाऱ्या व्हिडिओमुळे अनेक सोशल मीडिया युजर्स चिंता व्यक्त करत आहेत. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सॲपवर फिरत असलेल्या या व्हिडिओने चिंता निर्माण केली असून संबंधित व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. चिंताग्रस्त युजर्सनी एनईसीटी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. न्यूजचेकरला आढळले आहे की दावा खोटा आहे आणि व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे.

Fact Check: पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी केला हल्ला? खोटा आहे हा दावा

पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी हल्ला केला असा दावा सध्या एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे. सुरुवातीला व्हाट्सअपच्या माध्यमातून हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

केरळ कोचिंग सेंटर टॉपर्सची वर्तमानपत्रातील जाहिरात खोट्या सांप्रदायिक ‘नीट जिहाद’ दाव्यासह व्हायरल

NEET-UG पेपर-लीक प्रकरणात अनेक अटकेच्या पार्श्वभूमीवर, वार्षिक परीक्षेत 'मुस्लिम नेक्सस' आणि 'परीक्षा जिहाद' असा आरोप करणारे नरेटिव्ह सध्या सोशल मीडियावर चर्चेला आले आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे भाषण चुकीच्या संदर्भाने होतेय शेयर

नवनिर्वाचित लोकसभेतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यात राहुल गांधी, "जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात, ते … 24 तास हिंसाचार, हिंसाचार, हिंसाचार, द्वेष, द्वेष, द्वेष…," असे म्हणताना दिसतात.

Fact Check: सर्पदंशावरील रामबाण उपाय सांगणारा मेसेज आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे

सर्पदंशावरील रामबाण उपाय असे सांगत एक भलामोठा टेक्स्ट मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रामुख्याने व्हाट्सअपवरून हा मेसेज मोठ्याप्रमाणात प्रसारित केला जात आहे. हा उपाय केला की सर्पदंश झालेल्या रुग्णाचा जीव तीन तासात वाचविता येतो, असा दावा केला जात आहे.

इतरांसाठी रेल्वे तिकीट बुक करणाऱ्याना नवीन आयआरसीटीसी नियमानुसार शिक्षा होईल? नाही, व्हायरल दावा खोटा आहे

नवीन आयआरसीटीसी नियमानुसार व्यक्ती केवळ रक्ताच्या नातेवाईकांसाठी किंवा त्यांचे वैयक्तिक आयडी वापरून समान आडनाव असलेल्यांसाठी तिकीट बुक करू शकतात. त्यात पुढे म्हटले आहे की मित्रांसाठी किंवा इतरांसाठी तिकीट बुक केल्यास 10,000 रु.चा मोठा दंड किंवा 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही होऊ शकतो.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read