Tuesday, November 26, 2024
Tuesday, November 26, 2024

Yearly Archives: 2024

Fact Check: राहुल गांधींचा ५ जूनच्या बँकॉकच्या फ्लाइटचा बोर्डिंग पास? व्हायरल इमेज एडिटेड आहे

अनेक सोशल मीडिया युजर्स २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जून रोजी बँकॉक, थायलंडसाठी विस्तारा फ्लाइटसाठी बुक केलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित बोर्डिंग पासची प्रतिमा शेयर करत आहेत. ही व्हायरल प्रतिमा सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील NDA साठी मोठ्या विजयाचा (३५० पेक्षा जास्त जागा) अंदाज वर्तवणाऱ्या अनेक एक्झिट पोलमध्ये आली आहे.

Fact Check: छत्रपती शिवरायांचे खरे छायाचित्र म्हणून जोधपूरच्या महाराजांचा फोटो होतोय शेयर

छत्रपती शिवरायांचे खरे छायाचित्र असे सांगत एक छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. "आपल्या देशातील बॉलीवूड दिग्दर्शकही वास्तव दाखवत नाहीत. पण काळजी करू नका, माझे काम तुम्हाला सत्य दाखवणे आहे." अशा कॅप्शनखाली हा दावा व्हायरल होत आहे.

Weekly Wrap: लोकसभा निवडणूक आणि इतर विषयांवरील दाव्यांचे फॅक्टचेक

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक फेक दावे सोशल मीडियावर व्हायरल झाले. राष्ट्रवादीचे माजी नेते मजीद मेमन यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाबचा बचाव केला होता, असा दावा करण्यात आला. POK मधील बकरवाल समाजाने भारत आणि भारतीय लष्कराला पाठींबा देण्याची शपथ घेतली, असा दावा करण्यात आला. पुण्यातील एका हुक्का बारवर छापेमारी करत ३० जणांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले, असा दावा करण्यात आला. हिंदू महिलेवर मुस्लिम पतीने हल्ला केला, असा दावा करण्यात आला. ईव्हीएमने भरलेले ट्रक भाजपच्या इशाऱ्यावर नेले जात असताना पकडले गेले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांना अबुधाबीचा शेख स्वतः घ्यायला आला? नाही, खोटा आहे हा दावा

बागेश्वर धाम सरकार श्री धीरेंद्र शास्त्री यांना अबुधाबीचा शेख स्वतः घ्यायला आला. असा दावा सध्या एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

2024 लोकसभा निवडणूक: भाजपकडून EVM चोरी? 2022 चा व्हिडिओ खोट्या दाव्यांसह पुन्हा होतोय शेयर

लोकसभेच्या मतदानादरम्यान ट्रकवर चढून आणि ईव्हीएम मशिन धरून ठेवलेल्या जमावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. सत्तावीस सेकंदांच्या दीर्घ-फुटेजमध्ये एक व्यक्ती भाजपवर ईव्हीएम चोरीचा आरोप करताना ऐकू येते.

Fact Check: महिलेवरील हल्ल्याचा जुना व्हिडिओ खोट्या सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल

सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पुरुष लहान मुलाच्या उपस्थितीत महिलेवर अत्याचार करताना दिसत आहे. हिंदू महिलेला शिवीगाळ करणारी व्यक्ती हा तिचा मुस्लिम नवरा आहे, जो तिला हिंदू विधीनुसार दिवा लावण्यासाठी मारहाण करत असल्याचा दावा या व्हिडिओसह केला जात आहे.

आग्रा येथील हॉटेलवर पोलिसांच्या छाप्याचा जुना व्हिडीओ, पुण्याचा असल्याचा खोटा सांप्रदायिक दावा करून व्हायरल

पुण्यातील एका हुक्का बारवर छापेमारी करत ३० जणांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले, त्यापैकी एकूण १५ मुली हिंदू आणि सर्व मुले मुस्लिम असल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत केला जात आहे.

Fact Check: इराणच्या राष्ट्राध्यक्षांवरील सोशल मीडिया पोस्टसाठी नव्हे तर 2007 मध्ये न्यायाधीशाच्या हत्येसाठी देण्यात आली होती फाशी, येथे जाणून घ्या सत्य

इराणच्या राष्ट्राध्यक्षांवरील सोशल मीडिया पोस्टसाठी एका व्यक्तीस फाशी देण्यात आली. यावेळी आपल्या मुलीला दुःख होऊ नये म्हणून तो हसत होता.

Fact Check: POK मधील बकरवाल समाजाने भारत आणि भारतीय लष्कराला पाठींबा देण्याची शपथ घेतली? जाणून घ्या सत्य काय आहे

POK अर्थात पाक व्याप्त काश्मीर मधील बकरवाल समाजाने भारत आणि भारतीय लष्कराला पाठींबा देण्याची शपथ घेतली. असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

Fact Check: राष्ट्रवादीचे माजी नेते मजीद मेमन यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाबचा बचाव केला होता का? आम्हाला हे सापडले

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाबच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट दिले, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभेचे तिकीट न्यायालयात दहशतवादीचा बचाव करणाऱ्या मजीद मेमन या वकिलांना दिले.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read