Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

Yearly Archives: 2024

Fact Check: लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून होणार ४ टप्प्यात? व्हायरल दावा खोटा आहे

लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून ४ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. X वर हा दावा अनेक युजर्सनी केला असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

Weekly Wrap: अक्षय कुमारच्या डीपफेक व्हिडिओपासून आदित्य ठाकरेंच्या नक्कलीपर्यंत प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर फेक दावे पाहायला मिळाले. भाजपचा जास्त पुळका करू नका. भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही, असा दावा करण्यात आला. मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी जाहिरात अभिनेता अक्षय कुमारने केली, असा दावा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही युवावस्थेतील छायाचित्रे आहेत असा दावा करण्यात आला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नक्कल शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ ११ वर्षे जुना

आदित्य ठाकरेंची भास्कर जाधवांनी नक्कल केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नक्कल त्यांच्याच पक्षातील भास्कर जाधव यांनी केली असे सांगत हा दावा शेयर केला जात आहे.

Fact Check: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवावस्थेतील म्हणून व्हायरल फोटोंचे जाणून घ्या सत्य

चार छायाचित्रांचा कोलाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check: मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची डीपफेक जाहिरात व्हायरल

मोबाईल गेम ॲपचा प्रचार करणारी अक्षय कुमारची जाहिरात व्हायरल झाली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स एक क्लिप प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये कथितपणे बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मोबाईल गेम ॲप, एव्हिएटरचे समर्थन करताना दिसत आहे, जे सट्टेबाजीद्वारे सहज पैसे देण्याचे वचन देते. ट्विटच्या संग्रहित आवृत्त्या येथे आणि येथे पाहता येतील.

Fact Check: मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असे सांगणारा एक दावा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल आहे.

Weekly Wrap: राम मंदिराचे भरलेले दानपत्र ते भजनावर आयएएस महिलेच्या नृत्यापर्यंत मागील आठवड्यातील महत्वाचे फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक क्लेम व्हायरल झाले. अयोध्या राममंदिराचे दानपात्र अर्ध्या दिवसात भरले, असा दावा करण्यात आला. महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. मीरा रोडच्या घटनेनंतर पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्यांना बेदम मारहाण केली. असा दावा करण्यात आला. व्हिडिओमध्ये तलवारबाजी करताना दिसणारी महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आहेत. असा दावा करण्यात आला. ‘मेरे घर राम आये हैं’ गाण्यावर नृत्य करणारी ही महिला ओडिशाच्या संबलपूरची जिल्हाधिकारी अनन्या दास आहे. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: ‘मेरे घर राम आये हैं’ या भजनावर नृत्य करणारी महिला संबलपूरच्या जिल्हाधिकारी अनन्या दास नाहीत

'मेरे घर राम आये हैं' गाण्यावर एका महिलेचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ओडिशाच्या संबलपूरच्या जिल्हाधिकारी अनन्या दास असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे.

Fact Check: तलवारबाजी करणारी ही महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी नाहीत, व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या

एका महिलेचा तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तलवारबाजी करणारी ही महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही

मीरा रोड येथील नुकत्याच घडलेल्या घटनेशी जोडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये पोलीस काही लोकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. मात्र, आमच्या तपासणीत आम्हाला आढळून आले की हा व्हिडिओ मीरा रोड हिंसाचाराशी संबंधित नाही.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read