Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

Yearly Archives: 2024

Fact Check: श्रीराम आणि राम मंदीराचे चित्र असलेली पाचशे रुपयांची नोट आल्याचा दावा खोटा आहे

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, 500 रुपयांच्या नोटेवर आता भगवान श्रीराम आणि राम मंदिराचे चित्र घातले जाणार आहे. किंवा अशी चित्रे घातलेली नवी नोट आली आहे.

Fact Check: राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला देताहेत फ्री मोबाईल रिचार्ज? नाही, व्हायरल दावा खोटा आहे

राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत. असे सांगणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

Weekly Wrap: अयोध्या राम मंदिराशी जोडून दावे आणि आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

अयोध्या राम मंदिराशी जोडून दावे आणि इतर अनेक फेक दाव्यांनी मागील आठवडा गाजला. DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली, असा दावा करण्यात आला. 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली, असा दावा करण्यात आला. रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली, असा दावा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. असा दावा करण्यात आला. काँग्रेसने आपल्या वर्गणी जमा करण्याच्या योजनेसाठी सोनिया गांधी यांच्या फोटोचा वापर क्यू-आर कोडसाठी केला आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: काँग्रेसने जारी केला सोनिया गांधींच्या फोटोचा क्यू-आर कोड? येथे जाणून घ्या सत्य

"काँग्रेसने जारी केला सोनिया गांधींच्या फोटोचा क्यू-आर कोड" असा दावा करणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

मालदीवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनाचा जुना व्हिडिओ सध्याचा म्हणून व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मालदीवमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

Fact Check: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरील हल्ल्याचा आठ वर्षे जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल

रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली.

Fact Check: 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली का? जाणून घ्या सत्य काय आहे

1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली होती, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून हा दावा केला जात आहे.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान मोदी दुपारी मंदिराच्या गर्भगृहात धार्मिक विधी सुरू करतील. या सोहळ्यासाठी सुमारे 7 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, झी न्यूजसह इतर प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष DMK खासदार कनिमोझी यांच्या कुटुंबीयांनी राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read