After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim- हा वृद्ध व्यक्ती बेरोजगारांचे नोकरीचे अर्ज भरुन गुजराण करत होता. आता त्याचा टाईपरायटर दुरुस्त करण्याजोगा देखील राहिला नाही.
Verification
गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोंमधील पहिल्या फोटोत एक पोलीस इन्स्पेक्टर टाइपरायटरला लाथ मारताना दिसत आहे तर दुस-या फोटोत एक वृद्ध व्यक्ती पोलीस इन्स्पेक्टर समोर हात जोडून उभा आहे. तर तिस-या फोटोत तो वृद्ध तुटलेला टाईपरायटर हातात घेऊन रस्त्यावर हताशपणे बसलेला दिसत आहे. अख्तर यांना ट्विटमध्ये दावा केला आहे की हा वृद्ध माणूस बेरोजागरांचे अर्ज टाईप करुन गुजराण करत होता. आता त्याचा टाईपरायटर दुरुस्त करण्यासारखा देखील राहिला नाही.
या पोस्टबद्दल टविटर वर शोध सुरू केला असता आम्हाला दोन वर्षापूर्वीचं एक ट्विट आढळून आले त्यात लिहिले होते- (मराठी अनुवाद) हे आहे या देशाचं सत्य. पहा एक पोलीस अधिकारी गरीब माणसाला कसा त्रास देत आहे .
हे प्रकरण आत्ताचे नाही तर फार जुने असल्याती माहिती या ट्विटमुळे लक्षात आली. पण दोन्ही ट्विट्स मध्ये अपुरी माहिती असल्याने नेमके काय प्रकरण आहे याबाबत पडताळणी सुरू केली. ट्विटर वर शेअर करण्यात आलेल्या फोटोंबद्दल काही मिळतेय का हे पाहण्यासाठी गुगल रिवर्स इमेज आणि यांडेक्सचा आधार घेतला. गुगल रिवर्स इमेजद्वारे शोध घेतला असता या फोटोचे काही रिझल्ट्स समोर आले.
आम्ही यासंबंधी पडताळणी सुरू ठेवली असता एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर सप्टेंबर 2015 मध्ये प्रकाशित झालेली बातमी आढळून आली. या बातमीनुसार उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमधील जीपीओच्या समोरील फुटपाथवर टायपिंगचं काम करणा-ाया वृद्धासोबत गैरवर्तन करणा-या पोलिस अधिका-याला निलंबित करण्यात आले आहे. अधिका-याच्या गैरवर्तनाचे फोटो सोशल मिडियात व्हायरल झाले हे फोटो मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पाहिले आणि त्यांनी तात्काळ त्या अधिका-याला निलंबित करण्याचे आदेश दिले.
यावरून स्पष्ट होते की हे प्रकरण आत्ताचे नसून 2015 चे आहे. तसेच आम्हाला दैनिक भास्कर मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी मिळाली यात प्रकरणाविषयी संपूर्ण माहिती मिळाली. बातमीनुसार सचिवालय पोलिस ठाणे इन्जार्ज इन्स्पेक्टर प्रदीप कुमार जीपीओ चौकात आले आणि रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या दुकानांतील सामानांची मोडतोड करु लागले. याच दरम्यान त्यांना वृद्ध टायपिस्ट कृ्ष्ण कुमार यांचा टाईपरायटर फेकून दिला. वृद्ध व्यक्तीने त्यांना हात जोडून विनंती केली पण ते एेकण्याच्या मनस्थितीत नव्हते. चहाची टपरी चालवणा-याची भांडी देखील फेकून दिली, यामुळे तेथे ठेवलेले दुध रस्त्यावर सांडले.
माध्यमांत यासंंबंधी बातम्या आल्यानंतर त्या अधिका-ायवार आणि पोलिस विभागावर सोशल मिडियात सडकून टिका झाली. यानंतर डीएम राजेशेखर यांनी वृद्धाला नवीन टाईपरायटर दिला, शिवाय पोलिस संरक्षणही देण्यात आले. याची बातमी अमर उजाला मध्ये छापून आली होती.
यावरुन स्पष्ट होते की, पोलिस अधिका-याने वृद्ध टायपिस्ट कृष्णुकुमार यांचा टाईपरायटर मोडला होता, पण हे प्रकरण चार वर्षापूर्वीचे आहे. शिवाय डीएम राजेशखर यांनी नवीन टाईपरायटर दिला होता.
Tools Used
- Twitter Advanced Search
- Google Keywords Search
- Google Reverse Image
- Yandex Image Search
Result- Misleading
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.