After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim–
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे शेवटचे शब्द- मी जेवढे करणे शक्य होते तेवढे केले. आता जनतेला स्वत : ची लढाई स्वत: लढावी लागेल.
Verification– पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा हाॅस्पिटलमधील बेडवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात इम्रान खान म्हणत आहेत की- मी जीवनभर पाकिस्तानसाठी लढलो आहे, जे शक्य होते ते मी केले, आता मला वाटते की तुम्ही तुमची जबाबदारी घ्या, तुमचे नशीब बदलावेसे वाटत असेल तर तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, मी पुन्हा सांगतोय जेवढे करणे शक्य होते तेव्हढे केले आहे आपल्या देशासाठी.
आम्ही काही कीवर्ड्सच्या साहाय्याने इम्रान खान यांच्याबद्दल गूगलमध्ये अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याविषयीच्या अनेक बातम्या आढळून आल्या.
याशिवाय आणखी एक आज
दैनिक जागरण या वेबसाईट वर आज प्रकाशित झालेली बातमी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी मंत्री जरताज गुल वजीर ने इम्रान खान यांचे स्मितहास्य कातिलाना असल्याचे म्हटले आहे.
या बातम्यांमध्ये कुठेही इम्रान खान हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याचा किंवा शेवटची घटका मोजत असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ट्विटमध्ये शेयर करण्यात आलेल्या व्हिडिओचे नेमके काय सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यातीन काही स्क्रीनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा व्हिडिओ सात वर्षापूर्वींचा असल्याचे आढळून आले. द टेलिग्राफच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ मे 2013 मध्ये अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हटले आहे की- क्रिकेटनंतर राजकारणात प्रवेश केलेले इम्रान खान यांनी हाॅस्पिटलमधून बेडवरुन मुलाखत दिली. यात त्यांनी म्हटले आहे की हा नवीन पाकिस्तान आहे लोकांनी आता पुढे यायला पाहिजे मी शक्य तेवढे केले आत लोकांनी लढ़ले पाहिजे. एक रॅली दरम्यान खाली कोसळल्याने इम्रान खान यांच्या पाठीला मार लागला होता त्यामुळे त्यांना त्यावेळी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
या शिवाय पाकिस्तानमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र
डाॅनच्या वेबसाईटवर देखील ही बातमी 12 मे 2013 रोजी प्रकाशित झाली होती. यात म्हटले आहे की पाकिस्तान तेहरिक-ए-इंसाफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांनी पराभव स्वीकारल्यानंतर निवडणुकीत धांधली झाल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांचा पक्ष राष्ट्रीय विधानसभेच्या विरोधी बाकांवर बसणार असल्याचेही सूचित केले आहे.खान यांनी पाकिस्तानमधील निवडणूक आयोगाला (ईसीपी) जबाबदार धरले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की पाकिस्तानचे पंतप्रधान सध्या हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट नाहीत. 2013 च्या निवडणुकीत एक रॅलीदरम्यान ते वरुन खाली पडले होते त्यावेळी त्यांच्या पाठीला मार लागल्याने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात भ्रामक दाव्याने व्हायरल होत असल्याचे आमच्या पडताळणीत समोर आले आहे.
Sources
Twitter Advanced Search
Google Reverse Image
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.