Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeCoronavirusनागपूरच्या जिल्हाधिका-यांनी हिंदूंचा धार्मिक ग्रंथ गीतेचा अपमान केला का? जाणून घ्या व्हायरल...

नागपूरच्या जिल्हाधिका-यांनी हिंदूंचा धार्मिक ग्रंथ गीतेचा अपमान केला का? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim– नागपूरचे जिल्हाधिकारी विजय मानकर म्हणाले- हिंदुंचा धार्मिक ग्रंथ गीता हा कच-या फेकला पाहिजे.

Verification
ट्विटर वर आम्हाला एक ट्विट आढळून आले. यात एक वीडियो शेयर केला आहे याविषयी ट्विटमध्ये म्हटले आहे की, नागपूरचे जिल्हाधिकारी विजय मानकर यांनी म्हटले की, हिंदूंचा धर्मग्रंंथ गीता हा कच-याच्या डब्यात फेकला पाहिजे असे वक्तव्य केले आहे. हा व्हिडिओ एवढा व्हायरल करा की कलेक्टर सस्पेंड झाले पाहिजेत आणि जेलमध्ये गेले पाहिजेत. आम्ही हा व्हिडिओ बारकाईने एेकला तर पहिल्या काही सेंकदातच हा इसम हिंदीत भाषण देताना म्हणतो की- मैं ओपनली चैलेंज करता हू की, गीता को कचरे के डिब्बे में फेंकना चाहिए, इतना घटिया तत्वज्ञान है गीता में।
आम्ही या वायरल वीडियो बाबत पडताळणी करण्याचे ठरविले. काही कीवर्ड्सच्या आधारे शोध सुरु केला असता याच दाव्याच्या अनेक पोस्ट आणि ट्विट आणि यूट्यूब वीडियो शेअर केल्याचे देखील आढळून आले.
याशिवाय आम्हाला एक युटूयब व्हिडिओ देखील आढळून आला. मात्र हा व्हिडिओ मागील 2018 मध्ये अपलोड केला आहे.
त्यामुळे आम्ही सध्या नागपूरचे कलेक्टर कोण आहेत हे पाहण्याचे ठरवले. आम्हाला नागपूर जिल्ह्याच्या वेबसाईटवर सध्याचे कलेक्टर रविंद्र ठाकरे हे असल्याचे आढळून आले.
आम्ही विजय मानकर नेमके कोण आहेत याचा शोध सुरु केला असता इंटरनेटवर vijaymankar या वेवसाईटवर त्यांच्याविषयी माहिती मिळाली. ते अंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया  (AIMBSCS)
चे नेते असल्याचे म्हटले आहे.
आम्ही शोध सुरुच ठेवला असता आम्हाला जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवर 2017 मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी मिळाली या बातमीत म्हटले आहे की  दलित नेते विजय मानकर यांनी गीता फाडून कच-याच्या डब्यात फेकली पाहिजे असे विधान केले आहे.
आम्हाला व्हायरल होत असलेल्या क्लिपचा ओरिजनल व्हिडिओ देखील मिळाला. तो मे 2017 मध्ये यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ सुरु झाल्यानंतर 1 मिनिट 40 व्या सेंकदाला मानकर गीतेविषयी बोलताना दिसत आहेत.  हे भाषण त्यांनी छत्तीसगडमध्ये दिले होते.
यावरुन हेच स्पष्ट होते की, विजय मानकर हे नागपूरचे जिल्हाधिकारी नाहीत शिवाय त्यांचा हा व्हिडिओ जुना आहे. सध्या सोशल मीडियात तो चुकीच्या संदर्भाने व्हायरल होत आहे.
Sources
Twitter Advanced Search
Google Search
Youtube
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular