दाव्याचे संक्षिप्त विवरण- कोरोना व्हायरससंबंधी अनेक पोस्ट सोशल मीडियामध्ये शेअर होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा स्क्रीनशाॅट देखील व्हायरल झाला आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे की, मी फर्ग्युसन काॅलेजच्या प्राचार्यांना विनंती करतो की 31 तारखेपर्यंत काॅलेजला सुट्टी जाहीर करावी. फर्ग्युसन देशातील प्रतिष्ठित काॅलेज आहे. आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपण धोका पत्करु शकत नाही.
Verification–
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. यासाठी काही किवर्डस्च्या मदतीने गूगलमध्ये शोध घेतला असता कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा काॅलेज, चित्रपटगृहे, माॅल्स बंद ठेवण्याचे आदेश दिल्याच्या अनेक बातम्या आढळून आल्या.
याशिवाय आम्हाला
न्यूज 18 लोकमत ची बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा काॅलेज 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.
यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट पाहिले असता तेथे फर्ग्युसन काॅलेजच्या बाबती कोणतेही ट्विट आढळून आले नाही. आपण खाली पंतप्रधानांनी 15 मार्च रोजी केलेल्या ट्विट्स चे स्क्रीनशाॅट्स पाहू शकता.
याशिवाय आम्ही फर्ग्युसन काॅलेजचे प्राचार्य रविंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पंतप्रधांनानी अशी कोणतीही विनंती केली नाही राज्यातील इतर काॅलेजांप्रमाणे आमचेही काॅलेज बंद राहणार आहे. खोटी माहिती पसरवण्या-याच्या विरोधात आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत.
यावरुन हेच सिद्ध होते की राज्यातील शाळा काॅलेज 31 मार्च बंद आहेत, मात्र पंतप्रधानांनी फर्ग्युसन काॅलेजच्या प्राचार्यांनी विनंती केली नव्हती. सोशल मीडियात फोटोशाॅप्ड ट्विट व्हायरल करण्यात आले आहे.
Source
Google Search
Direct contact
Result- False