After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim–
कोरोनामुळे यंदा एमपीएससी, यूपीएससी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियाममध्ये सध्या एबीपी माझाच्या बातमीचा एक स्क्रीनशाॅट व्हायरल होत आहे यात यदांच्या एमपीएससी यूपीएससी परीक्षा रद्द करण्यात आल्याचे लिहिले आहे. हा स्क्रिनशाॅट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याच आशयाच्या पोस्ट देखील शेअर होत आहेत.
Verification–
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर याच आशयाची पोस्ट आढळून आली.
आम्ही या संदर्भात पुढे शोध सुरुच ठेवला मात्र आम्हाला या संदर्भातील एकही बातमी आढळली नाही.मात्र
युटयूब वर एक व्हिडिओ आढळून आला. यात म्हटले आहे की एबीपी माझाच्या बातमीचा उल्लेख करत म्हटले आहे की, यात कुठेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा रद्द होणार नाहीत असे म्हटले आहे. कोरोनामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्या तर विद्यार्थ्यांच्या वयोमर्य़ादेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटल्याचे सांगितले आहे.
आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( UPSC) या बाबतीत काय निर्णय घेतला आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत आयोगाची वेबसाईट तपासली असता कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या मिटिंगचे एक तसेच परीक्षांसदर्भात एक
प्रसिद्धीपत्रक आढळून आले. मात्र यात कुठेही यूपीएससी परीक्षा रद्द होणार असल्याचे म्हटलेले नाही.
याशिवाय आम्ही
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची वेबसाईट देखील तपासली तेथे ही परीक्षांसदर्भात एक प्रसिद्धीपत्रक आढळून आले. यात म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात कुठेही परीक्षा रद्द करण्यात आल्याचा उल्लेख नाही.
याशिवाय पत्र व सूचना कार्यालयाचे एक ट्विट देखील आढळून आले यात म्हटले आहे की, व्हायरल स्क्रिनशाॅटमधील बातमी खरी नसून कोणतीही परीक्षा रद्द केलेली नाही तर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांची नवी तारीख विद्यार्थ्यांना नंतर कळवली जाणार आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत तर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. व्हायरल बातमीच्या स्क्रिनशाॅट द्वारे सोशल मीडियात भ्रामक दावे करण्यात येत आहेत.
Source
Google Search
Twitter Advanced search
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.