Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeUncategorized @mrमायक्रोसाॅफ्टने सोनी कंपनी विकत घेतल्याची बातमी व्हायरल, जाणून घ्या सत्य

मायक्रोसाॅफ्टने सोनी कंपनी विकत घेतल्याची बातमी व्हायरल, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

मायक्रोसाॅफ्टने सोनी कंपनी विकत घेतल्याची बातमी दैनिक सुराज्य आणि दैनिक एकमत या वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. यात म्हटले आहे की, सरत्या वर्षाच्या अखेरीस एका नावाजलेली कंपनीचा मोठा आर्थिक सौदा झाल्याचे वृत्त आहे. कोरोनाने त्रस्त असलेली जनता करत असताना एक जुनी आणि स्मार्टफोन बाजारात अस्तित्वासाठी धडपडणारी मोठी सोनी कंपनी मायक्रोसॉफ्टने विकत घेतली आहे. हा सौदा 130 अब्ज डॉलरचा झाला आहे. 

सुराज्यच्या फेसबुक पेजवर देखील ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

फेसबुक, संग्रहित

दैनिक एकमत देखील सोनी कंपनी मायक्रोसाॅफ्टने विकत घेतल्याची बातमी दिली आहे.

संग्रहित

Fact Checking/Verification

सोनी कंपनी मायक्रोसॉफ्टने 130 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतली खरंच घेतली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र आम्हाला ही बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांत आढळून आली. नाही. एकमत आणि सुराज्य सोडले तर इतर मराठी वेबसाईटवर तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांत देखील दोन मोठ्या कंपन्यांच्या व्यवहाबद्दल बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही याबाबत अधिक शोध घेण्यास सुरुवात केली. gizbot.com या वेबसाईटवर मायक्रोसाॅफ्टने सोनी कंपनी विकत घेतली असल्याची बातमी खोटी असल्याचे म्हटले असल्याचे आढळून आले. वेबसाईटवरील लेखात म्हटले आहे की, ही बातमी पहिल्यांदा एका स्पॅनिश वेबसाईटवर प्रकाशित झाली होती तिचा इंग्लिश अनुवाद EN24 News केला होता. बातमीनुसार डीलचा फायदा एक्सबॉक्सच्या ग्राहकांना होणार आहे, कारण त्यांना सोनीचे प्लेस्टेशनवरील गेमदेखील उपलब्ध होणार आहेत. त्यांना स्पायडरमॅन आणि दी लास्ट ऑफ अस असे पॉप्युलर गेम खेळता येणार आहेत. या डीलमध्ये सोनीचा स्मार्टफोन बाजारात येणार आहे. तो सध्या सोनीच्या व्हिडीओ आणि साऊंड उत्पादनांमध्ये येतो, अशी माहिती देण्यात आली होती.

स्पॅनिश वेबसाईटने ही बातमी 28 डिसेंबर रोजी दिली होती. हा दिवस हिस्पॅनिक संस्कृतीत डे ऑफ द होली इनोसेन्ट्स म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तो एप्रिल फूल सारखा असतो. वेबसाईटवर ही बातमी गंमत म्हणून त्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली मात्र त्याचा उल्लेख इंग्रजी अनुवादात आला नाही. याशिवाय सोनी किंवा मायक्रोसाॅफ्ट ने माध्यमांत किंवा आपल्या सोशल मीडिया साईटवर देखील या डीलची माहिती दिली नसल्याने या बातमीविषयी साशंकता निर्माण झाली होती. ही बातमी खोटी असल्याची माहिती देणारे ट्विट देखील आम्हाला आढळून आले.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, मायक्रोसाॅफ्ट ने जपानमधील प्रसिद्ध सोनी कंपनी विकत घेतलेली नाही. ही एक अफवा आहे.

Result: False

Our Sources

gizbot-https://www.gizbot.com/news/did-microsoft-acquire-sony-or-was-it-fake-news-071794.html

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular