Authors
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, औरंगाबादमधील सभेसाठी मनसेला परवानगी मिळाली आहे.
फेसबुकवर हा फोटो खूपच व्हायरल झाला आहे. हा फोटो अनेक युजरने शेअर केला आहे. त्याचे स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी ठाण्याच्या सभेत ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला होता.
याच दरम्यान सभेच्या अगदी तोंडावरच औरंगाबादमध्ये कलम १४४ म्हणजेच जमावबंदी करण्यात आली आहे, अशाही बातम्या वृत्त वाहिन्यांनी केल्या होत्या. या विषयीची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
त्यातच आता सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असून त्यात दावा केलाय की, औरंगाबादमधील सभेसाठी मनसेला परवानगी मिळाली आहे.
Fact Check / Verification
औरंगाबादमधील सभेसाठी मनसेला परवानगी मिळाली, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो फोटो नीट पाहिला.
त्यानंतर “औरंगाबादेत मनसेला सभेसाठी परवानगी मिळाली” असं आम्ही गुगलला टाकून शोधले. तेव्हा आम्हांला टीव्ही ९ मराठीची एक व्हिडिओ मिळाली. ती व्हिडिओ १७ एप्रिल २०२२ रोजी अपलोड केली होती.
आम्ही तो तीन मिनिटांचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला. तेव्हा आमच्या लक्षात आले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेली फ्रेम आणि यूट्यूबवरील फ्रेम एकच आहे.
त्याचबरोबर आम्ही या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयाशी आम्ही काल २७ एप्रिल २०२२ रोजी संपर्क साधला. तेव्हा तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले की,”मनसेला १ मेच्या सभेसाठी अजूनही परवानगी मिळालेली नाही.”
या व्यतिरिक्त आम्ही औरंगाबादचे मनसे जिल्ह्याध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याशी आम्ही काल सकाळी १२ च्या दरम्यान संपर्क केला होता.
तेव्हा त्यांनी सांगितले,”अजून पर्यंत सभेला परवानगी मिळाली नाही. आज संध्याकाळी आमचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटणार आहे. त्यावेळी आम्हांला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.”
हे देखील वाचू शकता : औरंगाबादमध्ये खरंच कलम १४४ लागू करण्यात आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे
Conclusion
औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील कार्यालयाशी आणि मनसे जिल्ह्याध्यक्ष यांच्याशी बोलल्यानंतर हे स्पष्ट झाले की, औरंगाबादमधील सभेसाठी मनसेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो भ्रामक आहे.
Result : Fabricated Content/False
Our Sources
स्वतः केलेले विश्लेषण
औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाशी केलेला संवाद
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याशी केलेला संवाद
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.