Authors
Claim
चीनमधील शहरात आकाशातून पावसाद्वारे पडलेल्या अळ्यांनी व्यापलेल्या कार आणि रस्ते.
Fact
या पावसातून पडलेल्या अळ्या नसून उन्हाळ्यात नवी पालवी फुटण्याआधी गळणारी चिनार झाडाची फुले असून त्यांना अळ्या समजले जात आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. पार्क केलेल्या गाड्यांचे रूफ आणि बोनेट्सवर अळ्यासदृश्य दिसणाऱ्या गोष्टी त्यात आढळतात. काहींनी हा प्रकार चीनच्या बीजिंग मध्ये घडल्याचा दावा करीत आहेत. काहींनी लायनिंग प्रांतात ‘अळ्यांचा पाऊस’ पडल्याचा दावा केला आहे. अनेक युजर्सनी या घटनेला आश्चर्यकारक म्हटले असून चिनी अधिकाऱ्यांनी स्थानिकांना आश्रय देण्याची शिफारस केली आहे. असा दावा केला आहे. मात्र न्यूजचेकरला हे दावे चुकीचे आढळले आहेत.
अनेक वेरिफाइड हॅन्डल्स तसेच इनसायडर पेपर सारख्या माध्यमांचाही ‘अळ्यांचा पाऊस’ पडल्याचा दावा करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
अशा पोस्ट इथे, इथे, इथे, इथे आणि इथे बघता येतील.
टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये चीनमध्ये ‘अळ्यांचा पाऊस’ अशा शीर्षकाखाली व्हायरल व्हिडिओवर भाष्य करण्यात आले आहे, तथापि, अँकरने व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळली गेली नाही. असे म्हणतांना ऐकायला मिळाले.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
आमच्या टीप लाईन वर आढळून आलेल्या दाव्यामध्ये झी २४ तास या न्यूज चॅनेलने ‘चीनमध्ये किड्यांचा पाऊस पडला’ असल्याचा थेट दावा केला असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
Fact check/ Verification
व्हायरल फुटेज असलेल्या एका पोस्टचा कॉमेंट विभाग स्कॅन केल्यावर, आम्हाला चिनी पत्रकार शेन शिवेई यांनी या व्हिडिओला “फेक” म्हटल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
“मी बीजिंगमध्ये आहे आणि हा व्हिडिओ खोटा आहे. आणि बीजिंगमध्ये सध्या पाऊस पडलेला नाही,” असे ट्विट त्यांनी केले आहे.
दुसर्या ट्विटर हँडल @Vxujianing ने देखील “चीनमधील अळ्यांचा पाऊस” वरील इनसाइडर पेपरच्या पोस्टला फेक न्यूज म्हटले आहे.
“वसंत ऋतूत चिनाराच्या वृक्षातून पडणाऱ्या गोष्टी या अळ्या नव्हे तर फुलांचे पुंजके किंवा मोहोर असतात. जेंव्हा हे पुंजके गळून पडू लागतात तेंव्हा हे झाड नव पालवी फुटण्यासाठी तयार झालेले असते” असे ही कॉमेंट सांगते.
ट्विटमध्ये छायाचित्रांचे दर्शनही घडविण्यात आले आहे, ज्यात जमिनीवर विखुरलेल्या चिनार वृक्षांचे फुलांचे पुंजके आणि ते पडलेल्या कारच्या बोनेटचे जवळून दर्शन होते.
@yuzhinoksana या ट्विटर युजरने असेही म्हटले आहे की, “या चिनार झाडाच्या बिया आहेत, ज्या खरे सांगायचे तर दुरून किड्यांसारख्या दिसतात.
11 मार्च 2023 रोजी केलेल्या ट्विटमध्ये, @journoturk ने “चीनमध्ये अळीचा पाऊस” या दाव्यांना “आठवड्यातील बनावट बातम्या” म्हटले आहे, या ट्विट मध्ये “Thousands of newspapers, TV channels and news sites all over the world shared that fake news: China Pummeled (pummelled) By Rain Of Worms. NO it was not rain of worms In fact those things on the cars were leaves as U can see from the video below.” असे लिहिलेले पाहायला मिळते.
पोस्टमध्ये झाडांखाली पार्क केलेल्या कारचा व्हिडिओ आहे, ज्याचा वरचा भाग फुलांनी झाकलेला आहे, जसा तो व्हायरल क्लिपमध्ये दिसतो.
शिवाय, 8 मे 2019 रोजीच्या CGTN च्या रिपोर्ट मध्ये, काळ्या चिनाराच्या कॅटकिन्स (फुलांची) एक प्रतिमा वैशिष्ट्यीकृत आहे जी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेल्या “अळ्या” सारखीच आहे.
Poplars अर्थात चिनार dioecious वनस्पती आहेत, याचा अर्थ नर आणि मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर वाढतात. पवन परागीकरणास मदत करण्यासाठी पाने बाहेर येण्याआधीच फुले झुकलेल्या कॅटकिन्समध्ये (pendulous unisexual flower clusters) फुलतात.
चिनार वृक्षांच्या फुलांच्या इतर प्रतिमा येथे, येथे आणि येथे दिसू शकतात.
Conclusion
त्यामुळे आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की चीनमध्ये अळीचा पाऊस पडत असल्याचा दावा करण्यासाठी शेअर केलेला व्हायरल व्हिडिओ खोटा आहे. या क्लिपमध्ये प्रत्यक्षात गाड्या आणि रस्त्यांच्या पृष्ठभागावर विखुरलेल्या चिनार झाडांचे कॅटकिन्स किंवा फुले दिसत आहेत, ते कोणतेही कीटक किंवा अळ्या नाहीत.
Result: False
Sources
Tweet By Shen Shiwei, Dated March 10, 2023
Tweet By @Vxujianing, Dated March 11, 2023
Tweet By @yuzhinoksana, Dated March 12, 2023
Tweet By @journoturk, Dated March 11, 2023
Report by CGTN, dated May 8, 2019
(हा लेख सर्वप्रथम विजयलक्ष्मी बालसुब्रमण्यन यांनी न्यूजचेकर तमिळमध्ये प्रकाशित केला होता)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in