Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeFact CheckFact Check: पुण्यात तरुणीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ खोटा जातीयवादी दावा करून व्हायरल

Fact Check: पुण्यात तरुणीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ खोटा जातीयवादी दावा करून व्हायरल

Authors

An Electronics & Communication engineer by training, Arjun switched to journalism to follow his passion. After completing a diploma in Broadcast Journalism at the India Today Media Institute, he has been debunking mis/disinformation for over three years. His areas of interest are politics and social media. Before joining Newschecker, he was working with the India Today Fact Check team.

Claim
पुण्यात एका मुस्लिमाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला केला पण लोकांनी तिला वाचवले.

Fact
ही पुण्यातील 27 जून 2023 ची घटना आहे, परंतु आरोपी आणि पीडित दोघेही हिंदू समाजातील आहेत.

पुण्यातील एका मुस्लीम व्यक्तीने एकतर्फी प्रेमात एका तरुणीवर हल्ला केला, पण तेथे उपस्थित लोकांनी तिला वाचवले. असा एक दावा एक व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन तरुणीच्या मागे धावताना दिसत आहे. तरुणी त्या माणसापासून वाचण्यासाठी पळत असताना तो माणूस तिच्यावर हल्ला करतो. त्या माणसाच्या मागे काही लोकही धावताना दिसतात. हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजचा आहे.

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “जबरदस्ती प्यार:-पुणे में जिहादीर ने एकतरफा प्यार में एक लड़की पर हमला किया, उसे मारने की कोशिश की लेकिन वहां मौजूद लोगों ने हस्तक्षेप किया और उस लड़के को पकड़ लिया और लड़की को बचा लिया। पुणेवासियों को उनके प्रयासों के लिए सलाम!”. फेसबुक आणि  ट्विटर वर याच कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.

Fact Check/ Verification

काही कीवर्डच्या सहाय्याने व्हिडिओ शोधल्यावर आम्हाला त्याबद्दलच्या अनेक बातम्या सापडल्या. ही घटना 27 जून 2023 रोजी पुण्यात घडल्याचे वृत्तात म्हटले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, शंतनू लक्ष्मण जाधव नावाच्या एका मुलाने 19 वर्षीय विद्यार्थिनीवर विळ्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

बातमीत पुढे सांगण्यात आले आहे की शंतनू मुलीला आधीच त्रास देत होता. पुणे मिररनेही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असून या मुलाचे नाव शंतनू लक्ष्मण जाधव असे लिहिले आहे.

शिवाय, द इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, मुलीने त्याच्या वाईट वर्तनामुळे कथितपणे त्या पुरुषासोबतचे नाते तोडले होते. 27 जून रोजी मुलगी दुसऱ्या मित्रासोबत कॉलेजला जात असताना जाधव याने तिला अडवले. यानंतर जाधवचा तरुणीच्या मित्रासोबत वाद सुरू झाला.

ही घटना पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी आम्ही पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आणि स्टेशन प्रभारी दादासाहेब गायकवाड यांच्याशी बोललो. या प्रकरणातील आरोपी आणि पीडित महिला हिंदू समाजातील असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात कोणताही जातीय कोन नाही.

Conclusion

अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओद्वारे दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. पुण्यातील या घटनेत दोन्ही पक्ष एकाच समाजाचे आहेत.

Result: False

Our Sources
Report of NDTV published on June 27, 2023
Reports of The Indian Express and Pune Mirror


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Authors

An Electronics & Communication engineer by training, Arjun switched to journalism to follow his passion. After completing a diploma in Broadcast Journalism at the India Today Media Institute, he has been debunking mis/disinformation for over three years. His areas of interest are politics and social media. Before joining Newschecker, he was working with the India Today Fact Check team.

Most Popular