Authors
सोशल मीडियावर विविध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टचा धुमाकूळ मागील आठवड्यातही कायम राहिला. नवी दिल्ली येथे 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या आधी झोपडपट्ट्या चादरीने झाकल्या असा दावा करण्यात आला. तारागडमध्ये बिबट्याने कच्ची दारू पिली असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. युनायटेड किंगडमच्या राणीने इतिहासात प्रथमच भारतीय पंतप्रधानांना त्यांच्या रॉयल पॅलेसमध्ये आमंत्रित केले, असा दावा करण्यात आला. अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘श्री रुद्रम स्तोत्राचे’ पठण झाले. असा दावा झाला. ऑक्सफर्ड डिक्शनरीत भारतीयांचा अपमान करण्यात आला. असा दावा व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
G20 शिखर परिषदेच्या आधी झोपडपट्ट्या चादरीने झाकल्या?
नवी दिल्ली येथे 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या आधी झोपडपट्ट्या चादरीने झाकल्या असा दावा करण्यात आला, आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
मोदी रॉयल पॅलेसला जाणारे पहिले पंतप्रधान नाहीत
युनायटेड किंगडमच्या राणीने इतिहासात प्रथमच भारतीय पंतप्रधानांना त्यांच्या रॉयल पॅलेसमध्ये आमंत्रित केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
बिबट्याने कच्ची दारू पिली?
तारागडमध्ये बिबट्याने कच्ची दारू पिली असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.
अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘श्री रुद्रम स्तोत्राचे’ पठण झाले?
अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘श्री रुद्रम स्तोत्राचे’ पठण झाले. असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.
ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय?
ऑक्सफोर्ड डिक्शनरीने इंडियनचा अर्थ क्रिमिनल असा केलाय असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in