Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckFact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य...

Fact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य वाचा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
सीमा हैदरने नदीत उडी मारून आत्महत्या केली.
Fact
नाही, व्हायरल दावा खोटा आहे. सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनीही हा दावा फेटाळून लावला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, “पोलिस आणि मीडियाच्या छळामुळे सीमा हैदरने नदीत उडी मारून आत्महत्या केली”.

Fact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य वाचा
Courtesy: Facebook/ Game 41

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य वाचा

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, प्रथम आम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. आम्ही या व्हिडिओवर “प्रजापती भाई” नावाचा वॉटरमार्क पाहिला. जेव्हा आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संबंधित खाते शोधले तेव्हा आम्हाला त्याच नावाचे YouTube चॅनेल सापडले.

Fact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य वाचा

YouTube चॅनल स्कॅन केल्यावर, आम्हाला आढळले की हा व्हिडिओ 21 सप्टेंबर 2023 रोजी या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला होता.

याशिवाय, हे चॅनल गेल्या अनेक महिन्यांपासून सीमा हैदरवर तिच्याबद्दल वेगवेगळे दावे करत व्हिडिओ बनवत असल्याचेही आम्हाला आढळून आले आहे. कथित दावे करण्यासाठी बहुतांश व्हिडिओंमध्ये असंबंधित दृश्यांचा समावेश आहे. खालील चित्रात या चॅनेलवर अपलोड केलेल्या काही व्हिडिओंच्या थंबनेल्सवरून तुम्ही हे सहज समजू शकता.

Fact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य वाचा

यानंतर, आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने न्यूज रिपोर्ट देखील शोधले. यादरम्यान आम्हाला सीमा हैदरशी संबंधित अनेक अलीकडील रिपोर्ट देखील प्राप्त झाले. यातील काही रिपोर्ट सीमा हैदरच्या कथित सोशल मीडिया अकाउंटवरून अपलोड केलेल्या व्हिडिओंवर आधारित आहेत, तर काहींमध्ये त्यांनी महिला आरक्षण विधेयकावर दिलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. परंतु आम्हाला असा कोणताही रिपोर्ट सापडला नाही ज्यामध्ये व्हायरल दाव्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Fact Check: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने आत्महत्या केली का? येथे सत्य वाचा

यानंतर आम्ही आमचा तपास मजबूत करण्यासाठी सीमा हैदरचे वकील एपी सिंग यांच्याशीही संपर्क साधला. व्हायरल झालेल्या दाव्याचे खंडन करताना ते म्हणाले, “काही चॅनेल प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी सीमाबद्दल अशा अफवा पसरवतात. या दाव्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. आम्ही लवकरच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून अशा अफवा पसरवणार्‍या आणि तथ्य नसलेली माहिती शेअर करणार्‍या वाहिन्यांवर कारवाई करणार आहोत.”

त्यामुळे सीमा हैदरच्या आत्महत्येचा व्हायरल झालेला दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Source
Video from source YouTube account
Recent News Reports
Telephonic Conversation with Seema Haider’s Advocate AP Singh

(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीने केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in

फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va23tYwLtOj7zEWzmC1Z

Most Popular