Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: August, 2024

फॅक्ट चेक: राहुल गांधी विवाहित असून आपली विदेशी पत्नी आणि मुलांसमवेत सहलीवर गेलेत? जाणून घ्या सत्य काय आहे

राहुल गांधी विवाहित असून आपली विदेशी पत्नी आणि मुलांसमवेत सहलीवर गेले असा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: यूपीमध्ये हिंदू महिलेला 24 मुलं असल्याचा दावा खोटा, स्क्रिप्टेड व्हिडिओ खरा मानून होतोय शेअर

सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दावा करण्यात आला आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी हिंदू महिला 24 मुलांची आई आहे. व्हिडिओमध्ये महिला सांगते की 24 मुलांपैकी 16 मुले आणि 8 मुली आहेत, त्यापैकी सर्वात मोठा मुलगा 18 वर्षांचा आहे आणि सर्वात लहान मुलगा 1 वर्षाचा आहे.

Fact Check: पक्षी राष्ट्रध्वज फडकवत असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओमागील हे आहे सत्य

कोठूनतरी एक पक्षी येतो आणि ध्वजस्थंभावर अडकलेला ध्वज फडकावून जातो असे दर्शविणारा एक व्हिडीओ केरळच्या गावात राष्ट्रध्वज फडकवणारा पक्षी असे सांगून व्हायरल करण्यात आला आहे.

Fact Check: उद्धव ठाकरेंचा कणा झुकला असे सांगत व्हायरल फोटो एडिटेड आहे

"हिंदुत्वाचा सोडला बाणा, हिंदुद्रोह्यांपुढे झुकला उबाठाचा कणा!" असे सांगत एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीवेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला कणा झुकवाला अर्थात वाकून नमस्कार केला अशा आशयाने हा दावा केला जात आहे.

Fact Check: गर्भवती हत्तीणीला स्फोटकांनी भरलेले अननस खायला दिले होते ते मलप्पुरम गाव भूस्खलनात पूर्णपणे नष्ट झाले? येथे वाचा सत्य

वायनाडमध्ये 370 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या विनाशकारी भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी दावा केला की मलप्पुरम नावाचे एक गाव, जेथे बॉम्बने भरलेले अननस खाल्ल्यानंतर एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता, भूस्खलनात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

Fact Check: उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींचे पाय धुवावे असे नाना पटोले म्हणाले? खोटा आहे हा दावा

उद्धव ठाकरेंनी राहूल गांधींचे पाय धुवावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

Fact Check: बांगलादेशातील हिंदू महिलांची दुर्दशा दाखवणारा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात नाट्य आहे

शेख हसीना देश सोडून पळाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू समुदायावर लक्ष्यित हल्ल्यांच्या बातम्यांदरम्यान, हिंदूंवर क्रूरता दर्शविल्याचा दावा करणारे अनेक व्हिज्युअल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत.

Weekly Wrap: बांगलादेशातील उठाव ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंतच्या प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडाही सोशल मीडियावरील अनेक फेक दाव्यांनी चर्चेत राहिला. बांगलादेशातील उठाव ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत अनेक दावे करण्यात आले. बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे 14 टन मांस सापडले, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक असा दावा करीत एक फोटो व्हायरल झाला. केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. असा दावा करण्यात आला. रमजानमध्ये सलग ३० दिवस इफ्तार देणाऱ्या इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले, असा दावा करण्यात आला.

Fact Check: रमजानमध्ये सलग ३० दिवस इफ्तार देणाऱ्या इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले? खोटा आहे हा दावा

रमजानमध्ये सलग ३० दिवस इफ्तार देणाऱ्या इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले, असा दावा सध्या एका छायाचित्राच्या माध्यमातून व्हायरल केला जात आहे.

Fact Check: केंद्राने वक्फवर बंधने आणू नयेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे सांगणारे लोकमतचा लोगो असलेले क्रिएटिव्ह खोटे आहे

केंद्राने वक्फवर बंधने आणू नयेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचे सांगणारे लोकमतचा लोगो असलेले क्रिएटिव्ह सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read