Tuesday, November 26, 2024
Tuesday, November 26, 2024

Yearly Archives: 2024

Weekly Wrap: लोकसभा निवडणूक आणि इतर विषयांशी संबंधित दाव्यांचे फॅक्टचेक

लोकसभा निवडणुकीशी आणि इतर विषयांशी संबंधित दावे मागील आठवड्यात व्हायरल झाले. पीएम मोदींच्या हरियाणातील सभेत खुर्च्या रिकाम्या राहिल्या, असा दावा करण्यात आला. राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात, असा दावा करण्यात आला. शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला, असा दावा करण्यात आला. पुणे पोर्श क्रॅश प्रकरणात गुंतलेल्या किशोरवयीन मुलाने तो अपघातातून कसा सुटला याबद्दल फुशारकी मारणारे गलिच्छ रॅप गाणे तयार केले आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक खालील रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: व्हायरल रॅप व्हिडिओमध्ये पुणे पोर्श क्रॅश प्रकरणातील किशोरवयीन मुलाचा समावेश नाही

अनेक सोशल मीडिया युजर्स एक रॅप व्हिडिओ प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये दावा केला जात आहे की व्हिडिओत तो 17 वर्षीय मुलगा आहे, ज्याच्यावर कथितपणे त्याच्या पोर्श कारने पुण्याच्या दोन तंत्रज्ञांना चिरडल्याचा आरोप आहे, व्हिडिओत तो त्यांच्या मृत्यूची थट्टा करत असल्याचे आणि आपण अपघातातून कसा सुटला याबद्दल फुशारकी मारत आहे.

Fact Check: शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवला? नाही, व्हायरल दावा खोटा आहे

शिवसेनेच्या (UBT) रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकवला असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

Fact Check: राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

राहुल गांधी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात असे प्रश्नार्थक स्वरूपात विचारणारे दावे व्हायरल होत आहेत. राहुल गांधींच्या रॅलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते स्टेजवर भारतीय राज्यघटनेचे लाल रंगाचे पॉकेट बुक हातात धरलेले दिसत आहेत.

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला हा व्हिडिओ पीएम मोदींच्या हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील रॅलीचा आहे

गेल्या शनिवारी हरियाणामध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Weekly Wrap: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरील व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही अनेक फेक दावे व्हायरल झाले. काँग्रेस सत्तेवर आल्यास मुस्लिम धर्मगुरू हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे आमंत्रण देत आहेत, असा दावा करण्यात आला. भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली, असा दावा करण्यात आला. राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकात मुस्लिम समाजाकडून खुलेआम गोहत्या करतानाचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलचे सत्य येथे वाचा

कर्नाटकात मुस्लिमांनी गोहत्या केल्याच्या नावावर जीपच्या वर गाय बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कर्नाटकात मुस्लिम समाजाचे लोक खुलेआम गायींची कत्तल करत असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Fact Check: निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा व्हिडिओ एडिटेड आहे

राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत.

Fact Check: भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली? जाणून घ्या सत्य काय आहे

भाजपच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटे सापडली असे सांगत एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. घाटकोपर 170 मतदार संघात बूथ मटेरियल मध्ये सोन्याची बिस्कीट सापडले. असे हा दावा सांगतो.

Fact Check: काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना इस्लाममध्ये सामील होण्याचे निमंत्रण देण्यात येत असल्याच्या व्हिडीओमागील सत्य काय आहे?

एका मुस्लिम धर्मगुरूसारखा दिसणारा एक व्यक्ती हिंदूंच्या विरोधात बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. दावा आहे की, "पहा केरळ मध्ये कशा धमकवण्या सुरु आहेत..!! हिंदू जर जागा झाला नाही तर नक्कीच ही वेळ हिंदूंवर येणार आहे. वेळीच सावध व्हा. सतर्क रहा."

CATEGORIES

ARCHIVES

Most Read