Tuesday, November 26, 2024
Tuesday, November 26, 2024

Yearly Archives: 2024

Fact Check: काँग्रेसने प्रियंका यांना अमेठीतून आणि राहुल गांधींना रायबरेलीतून लोकसभेचे उमेदवार केले का? व्हायरल पत्र बनावट आहे

काँग्रेस पक्षाचे एक कथित लेटरहेड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठी आणि राहुल गांधी यांना रायबरेलीमधून उमेदवार बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Fact Check: या व्हिडिओमध्ये अदानी बंदरात निर्यात करण्यासाठी आणलेल्या गायी आहेत का? हे आहे व्हायरल व्हिडिओमागील सत्य

एका बंदरावर गुरांनी भरलेले अनेक ट्रक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. ज्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे त्यांचा दावा आहे की त्यात गौतम अदानी यांच्या समूहाच्या मालकीच्या अदानी बंदरातून निर्यात करण्यासाठी गायी आणल्या होत्या. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले. हा व्हिडीओ प्रत्यक्षात इराकमधील बंदराचा आहे.

Fact Check: एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत अमित शहा बोलतानाचा व्हिडिओ एडिटेड आहे

भाजपचे सरकार आल्यास एसटी-एससी आणि ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आणू, असे अमित शहा म्हणाले.

Fact Check: राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ AI निर्मित ऑडिओ क्लोनिंगचा प्रकार

राहुल गांधींनी काँग्रेसला राजीनामा दिल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ सर्वत्र पसरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check: उमेदवाराच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांना बोलू दिले नाही? जाणून घ्या सत्य

लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. राष्ट्रीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करीत आहेत. याचक्रमाने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक दावा केला जात आहे. एक व्हिडीओ शेयर करून हा दावा केला जात असून उद्धव ठाकरे यांना उमेदवाराच्या प्रचारादरम्यान बोलू दिले नाही असे हा दावा सांगतो.

Fact Check: कथित प्रॉक्सी मतदानामुळे मणिपूर मतदान केंद्रात नागरिकांनी ईव्हीएमची मोडतोड केल्याचा व्हिडिओ खोट्या दाव्यासह होतोय शेअर

मणिपूरमधील महिलांनी ईव्हीएम फोडले. कारण त्यांना कोणतेही बटण दाबल्यावर कमळाचेच चित्र छापलेले पाहायला मिळाले.

Weekly Wrap: लोकसभा निवडणुकीशी संबंधित व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक

लोकसभा निवडणूक सुरु असताना सोशल मीडियावर अनेक फेक दाव्यांनी धुमाकूळ घातला. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, अशी मशीन लावणार ज्यातून एका बाजूने बटाटा घालून दुसरीकडून सोने काढेन. असा दावा करण्यात आला. हिंदू मंदिरांची संपत्ती कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड, ख्रिश्चन चर्च आणि हज हाऊसला दिली. असा दावा करण्यात आला. मुस्लिम अल्पसंख्यांकांचा राष्ट्रीय संसाधनांवर पहिला हक्क आहे, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले. असा दावा झाला. काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांसाठी ₹719 चे मोफत रिचार्ज देत आहे. असा दावा करण्यात आला. इंस्टाग्राम आणि फेसबुक चालवणाऱ्या तरुणांना काँग्रेस दरवर्षी एक लाख रुपये देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख डाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत व्हायरल व्हिडीओ जुना आणि हरियाणाचा आहे

पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Fact Check: तरुण सोशल मीडिया युजर्सना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार का? राहुल गांधींच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी मंचावरून बोलताना दिसत आहेत कि, ”हमारे जो युवा हैं… जो आज सड़कोंपर घूम रहे हैं… इंस्टाग्राम-फेसबुक देख रहे हैं… उनके बैंक अकाउंट में साल का एक लाख रुपया… 8,500/- रूपए महीने का टकाटक टकाटक टकाटक टकाटक हमारी सरकार डालेगी।”

Fact Check: काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत आहे का? सत्य जाणून घ्या

काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांसाठी ₹719 चे मोफत रिचार्ज देत आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read