Friday, December 27, 2024
Friday, December 27, 2024

Yearly Archives: 2024

Weekly Wrap: विधानसभा निवडणुकीला जोडून व्हायरल दाव्यांचे फॅक्टचेक

२० नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीला जोडून असंख्य दावे व्हायरल झाले. महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीचा व्हिडीओ, असा दावा करण्यात आला. सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय, असा दावा झाला. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या पक्षाचे सरकार दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल. असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, असा दावा झाला. काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा काढण्यात आलाय, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

फॅक्ट चेक: अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार म्हणत व्हायरल श्रीराम घोषाचा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपूरचा आहे

अतिशय सुंदर पद्धतीने इमारतीतून श्रीराम घोष करीत महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात झाली असे सांगत एका इमारतीमधून श्रीराम जयघोष करणाऱ्या नागरिकांचा व्हिडीओ शेयर केला जात आहे.

फॅक्ट चेक: काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा? खोटा आहे हा दावा

काँग्रेसला मतदानासाठी थेट दुबई वरून फतवा काढण्यात आला आहे असा दावा News18 लोकमत चॅनेलच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

फॅक्ट चेक: गुजरातच्या प्रगतीसाठी महायुतीला मतदान करा असे भाजप महाराष्ट्रात सांगतोय? येथे जाणून घ्या सत्य

भाजपच्या जाहिरातीत मतदारांना गुजरातच्या प्रगतीसाठी महायुतीला मतदान करा, असे लिहिण्यात आल्याचा दावा व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला? येथे जाणून घ्या सत्य

महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

फॅक्ट चेक: शिवसेना (UBT) सरकार दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल असे संजय राऊत म्हणाले का? येथे जाणून घ्या सत्य

शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचा एक व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला आहे, जर सत्तेत आल्यास त्यांच्या पक्षाचे सरकार अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल असे संजय राऊत म्हणाल्याचे त्यात दिसते.

फॅक्ट चेक: सदा सरवणकर म्हणाले की, त्यांना उद्धव ठाकरे आठवतात? येथे जाणून घ्या सत्य

माहीमच्या जागेवर महायुतीने मनसेला पाठींबा द्यावा ही मागणी आणि महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना दिलेली उमेदवारी यावरून सध्या पेच सुरु आहे. याच परिस्थितीत मूळ शिवसेनेतुन फुटून आलेले सदा सरवणकर यांच्या नावाने एक दावा व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय? जाणून घ्या सत्य काय आहे

सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी नाही तर दिवाळीची लाइटिंग ही नको, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय, असा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

फॅक्ट चेक: पुढारी न्यूजचा लोगो वापरून संजय राऊतांचे विधान असे सांगत व्हायरल स्क्रिनशॉट खोटा आहे

पुढारी न्यूजचा लोगो वापरून संजय राऊतांचे विधान असे सांगत एक व्हायरल स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर पसरत आहे.

फॅक्ट चेक: लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मविआच्या उमेदवाराच्या निवडणूक रॅलीचा म्हणून पुन्हा व्हायरल

महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीचा व्हिडीओ असे सांगत कम्युनल अँगलने एक दावा केला जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read