Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

Monthly Archives: May, 2023

Fact Check: सूर्य थेट विषुववृत्तावर असल्याने २२ ते २८ मे दरम्यान भरपूर पाणी पिण्याचा सल्ला आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे

EQUINOX (जेथे सूर्य थेट पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या वर आहे) मुळे पुढील सात दिवस (22-28 मे) जास्त पाणी प्या. परिणामी, या काळात शरीरात जलद निर्जलीकरण होते. कृपया ही बातमी जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद... असा मेसेज सध्या व्हाट्सअप च्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे, उकाडा तीव्र झालाय, अशा वातावरणात सूर्य विषुववृत्तावर आला असल्याचा मेसेज अनेकांच्या भीतीमध्ये वाढ करीत आहे.

30 सप्टेंबरनंतर ₹2000 च्या नोटा कायदेशीर होतील का? तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे

RBI कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत नोव्हेंबर 2016 मध्ये जारी केल्यानंतर जवळपास सात वर्षांनी, RBI ने 19 मे 2023 रोजी ₹2,000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. तथापि, सध्याच्या नोटा legal tender म्हणून कायम राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

Fact Check: P-500 पॅरासिटामोल गोळ्यांमध्ये घातक माचुपो व्हायरस असतो का? व्हायरल अलर्टमागील सत्य हे आहे

अनेक सोशल मीडिया युजर्स पॅरासिटामॉल टॅब्लेट, विशेषत: P-500 बद्दल एक चेतावणी देणारा संदेश व्हायरल करीत आहेत. हा संदेश कुटुंबातील सदस्यांना प्रामुख्याने सांगा असे आवाहन केले जात आहे. व्हायरल फॉरवर्डच्या मते, “नवीन, अतिशय पांढर्‍या आणि चमकदार” टॅब्लेटमध्ये “माचुपो व्हायरस” असतो ज्याचा मृत्यू दर जास्त असतो.

Weekly Wrap: कर्नाटक विधानसभा निवडणुकीला जोडून व्हायरल दावे आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी झाली आणि निकाल १३ मे रोजी लागला. यामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय झाला. या घटनेशी संबंधित अनेक खोटे दावे मागील आठवड्यात करण्यात आले. कर्नाटकात काँग्रेसला निवडून दिल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी कर्नाटकाचे कौतुक केले. निवडणुकीत मतदान केंद्रांवर हेराफेरी आणि बोगस मतदान झाले. कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांनी हल्ला केला. असे दावे पाहायला मिळाले. भटकळ येथे काँग्रेसच्या विजयाच्या निमित्ताने पाकिस्तानचा ध्वज फडकविण्यात आला असा एक दावा करण्यात आला. काँग्रेसच्या विजयानंतर भाजपच्या झेंड्यावर गायीची कत्तल करण्यात आली. असा दावा एक व्हिडीओ शेयर करून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: डी. के. शिवकुमार पाठ्यपुस्तक फाडत असल्याचा 2022 चा व्हिडीओ, कर्नाटक निवडणुकीनंतरचा म्हणून व्हायरल

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 135 जागा जिंकल्याच्या काही दिवसांनंतर, काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी के शिवकुमार हे राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये व्ही डी सावरकर यांच्याशी संबंधित पाने फाडताना दिसत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर भाजपच्या झेंड्यावर गाईची कत्तल? नाही, खोट्या दाव्यांसह जुना व्हिडीओ होतोय शेयर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर काहींनी भाजपच्या झेंड्यावर एका गायीची क्रूरपणे कत्तल केली.

Fact Check: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या मृत्यूची बातमी पूर्णपणे खोटी आहे

अलीकडेच लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफचा मृत्यू झाल्याचा दावा करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. दावा केला जात आहे की अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

Fact Check: मुस्लिम जमावाने तरुणाला मारहाण करून तलवारीने त्याची मान कापल्याचे दृश्य खरे आहे का? ही घटना कुठे घडली आहे?

एका तरुणाला मुस्लीम गटाकडून मारहाण आणि चाकूने ठार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Fact Check: भटकळ येथे काँग्रेसच्या विजयाच्या निमित्ताने पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता का? नाही, हा दावा खोटा आहे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर लगेचच भटकळमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकल्याचा तथाकथित दावा व्हायरल झाला. भटकळमध्ये पाकिस्तानचा ध्वज फडकतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर खूप खळबळ उडाली. बर्‍याच युजर्सनी भटकळ येथे पाकिस्तानी ध्वज फडकल्याचे सांगितले, तर काहींनी इस्लामिक ध्वज फडकल्याचे पोस्ट केले. त्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.

Fact Check: मतदान केंद्रात हेराफेरीचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ कर्नाटकातील नाही

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रात हेराफेरी झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read