Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: May, 2023

Fact Check: कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांचा हल्ला? खोटा जातीय दावा व्हायरल

एका फोटो कोलाजसह असा दावा केला जात आहे की, काँग्रेसची सत्ता येताच मुस्लिमांनी कर्नाटकात आपले रूप दाखवायला सुरुवात केली आहे. 'काँग्रेस झिंदाबाद'चा नारा न दिल्याने कर्नाटकात एका जैन मुनीला मुस्लिमांनी मारहाण केल्याचे या दाव्यात म्हटले आहे.

पाक पंतप्रधानांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निवडून आणल्याबद्दल कर्नाटकचे अभिनंदन केले नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्विटरवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निवडून दिल्याबद्दल कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.

Fact Check: गुजरातमध्ये गेल्या 5 वर्षात 41,000 महिला खरोखरच बेपत्ता झाल्या आहेत का? व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घ्या

वादाच्या भोवऱ्यात प्रदर्शित झालेला 'द केरला स्टोरी' हा चित्रपट पाहत असतानाच गुजरातमध्ये ही घटना घडल्याचा दावा करत एक न्यूज पेपर कटिंग व्हायरल होत आहे. एका वृत्तपत्राच्या कटिंगवर छापलेल्या मथळ्यात असे लिहिले आहे की “गुजरातमध्ये गेल्या 5 वर्षांत 40000 महिला बेपत्ता झाल्या, धक्कादायक NCRB अहवाल” सोशल मीडियावर बरेच युजर्स वेगवेगळ्या मजकूरासह न्यूज पेपरचे कटिंग शेअर करत आहेत. काही दाव्यात 41000 महिला असा उल्लेखही पाहायला मिळत आहे.

Weekly Wrap: कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना मारहाण, ₹५०० च्या नोटा बंद आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

चुकीची माहिती पसरविण्याच्या बाबतीत मागील आठवड्यातही सोशल मीडिया युजर्स आघाडीवर राहिले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते देण्यास नकार देऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना मारहाण करण्यात आली असा दावा करण्यात आला. निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशिन्स भाजप नेत्याच्या वाहनात सापडल्याने त्यांची मोडतोड करण्यात आली असा दावा झाला. ₹५०० च्या नोटा चलनातून बंद करण्यात येणार आहेत, ISIS चे टीशर्ट घातलेला समूह केरळ मधील आहे तसेच शिर्डी साई ट्रस्ट ने राम मंदिराला देणगी देण्यास नकार देऊन हज कमिटीला ३५ कोटींची देणगी दिली असे दावे करण्यात आले. या दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: शिर्डी साई ट्रस्टने हज समितीला 35 कोटींची देणगी दिली आहे का?

शिर्डी साई मंदिर ट्रस्टच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिर्डी साई ट्रस्टकडून हज समितीला 35 कोटींची देणगी दिल्याचा दावा केला जात आहे. तर काही युजर्स म्हणत आहेत की शिर्डी साई मंदिराने हज समितीला 35 कोटी देणगी देत असताना अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देण्यास नकार दिला.

Fact Check: कर्नाटकात मतदान यंत्रांची तोडफोड करणाऱ्यांचा व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही लोक ईव्हीएम मशीन फोडताना दिसत आहेत. भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्यानंतर स्थानिक लोकांनी गोंधळ घातल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

CBSE चे निकाल 11 मे रोजी घोषित केले जातील असा दावा करणारे परिपत्रक बनावट आहे

CBSE इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षांचे निकाल 11 मे 2023 रोजी जाहीर होणार असल्याचे एक परिपत्रक सांगत आहे.

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा

कर्नाटकाची विधानसभा निवडणूक विविध कारणांनी देशभरात गाजली आहे. बुधवार दि. १० मे २०२३ रोजी एकीकडे निवडणूक होत असताना कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याबद्दल एक व्हिडीओ शेयर करून दावा करण्यात येत आहे. "#कर्नाटक के #सीएम को जूते और चप्पलों से पिटाई की गई एक गांव में जाकर वोट पूछने पर यह किसी न्यूज़ चैनल वाले ने अभी तक नहीं दिखाया copy ! यह देखिए वीडियो" अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ शेयर करण्यात येत आहे.

Fact Check: तामिळनाडूमध्ये ISIS टी-शर्टमधील पुरुषांचा जुना फोटो केरळचा म्हणून होतोय व्हायरल

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाभोवती सोशल मीडियाच्या वाढत्या गदारोळात, एकसारखे काळ्या रंगाचे टी-शर्ट घातलेल्या तरुणांचा एक गट दर्शविणारा फोटो, ज्यामध्ये “ISIS” असे शब्द आणि दहशतवादी संघटनेचा लोगो आहे, हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करणार्‍या युजर्सनी आरोप केला आहे की तो केरळचा आहे आणि या राज्यात व्यापक कट्टरतावाद आणि आयएसआयएसला पाठिंबा मिळत असल्याच्या दाव्याला हा फोटो पुरावा आहे.

Fact Check: ₹५०० च्या नोटा चलनातून बंद होणार आहेत? खोटा आहे हा मेसेज

भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच ₹५०० च्या नोटा चलनातून बंद करणार आहे. असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून हा संदेश पसरविला जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read