Friday, May 3, 2024
Friday, May 3, 2024

Yearly Archives: 2023

Fact Check: बेळगावात महिलेची नग्न परेड: उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेतोवर सरकारने कारवाई केली नाही? येथे वाचा सत्य

बेळगावमध्ये एका महिलेला विवस्त्र करून नग्न परेड केल्याच्या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. या घटनेची जशी बातमी झाली तशीच या घटनेबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी X वर टाकलेल्या पोस्टनेही बातमी बनली असून चर्चेत वाढ झाली आहे.

Weekly Wrap: मद्यधुंद सनी देओल, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी ते पुजाऱ्याचे अश्लील फोटो पर्यंत प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडाही सोशल मीडियावरील फेक पोस्टमुळे गाजला. लोकसभेतील भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यांवर फिरताना दिसला, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री मुस्लिमांना चेतावणी देत आहेत, असा दावा एक व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. राम मंदिराचे पुजारी म्हणून निवडल्या गेलेल्या मोहित पांडे यांची अश्लील चित्रे आहेत असे सांगणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. केरळमधील सबरीमालामध्ये भगवान अय्यप्पाच्या एका छोट्या भक्ताला अटक करण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे

पोलिसांसमोर हात जोडून 'पापा-पापा' म्हणत रडणाऱ्या मुलाचा त्रासदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की भगवान अय्यप्पा यांच्या एका छोट्या भक्ताला केरळमधील सबरीमाला येथून अटक करण्यात आली आहे.

Fact Check: व्हायरल झालेल्या अश्‍लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही आणि त्याला राम मंदिराच्या पुजारी पदीही नेमण्यात आलेले नाही

अलीकडेच, अनेक माध्यमांनी अयोध्येत निर्माणाधीन राम मंदिराबाबत दावा केला होता की, मोहित पांडे नावाच्या व्यक्तीला राम मंदिराचा मुख्य पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या दाव्यानंतर सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह फोटो व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये कपाळावर तिलक आणि चंदन लावलेला एक पुरुष एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आहे.

Fact Check: मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत, येथे वाचा पूर्ण सत्य

मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री यादव असल्याचे सांगत एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मीडियाशी बोलत आहे. "मुस्लिमांनी आपले इतर धार्मिक विधी करावेत मात्र देशविरोधी वागल्यास ठेचून काढले जाईल." असे व्हिडिओत ऐकायला मिळते.

Fact Check: सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर? व्हायरल व्हिडिओ चित्रपटाच्या शूटचा आहे

सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर फिरत असल्याचा दावा केला जात आहे. बॉलीवूड अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभा खासदार सनी देओल एका रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत दिसत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Weekly Wrap: महिलांना मोफत प्रवास, तीन राज्यात फेरनिवडणूक, कर्नाटकात कुराण शिक्षण आणि तिरंग्यावर कलमा पर्यंत प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यात सोशल मीडियावर फेक दाव्यांचा सुळसुळाट सुरूच राहिला. आजपासून महिलांना एसटी प्रवासात १०० टक्के सवलत देण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत, असा दावा झाला. कतारने सर्व 8 भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे, असा दावा करण्यात आला. केरळमध्ये मंदिराचे पुजारी पद मिळविण्यासाठी मुस्लिम शिक्षक मुस्लिमांच्या एका वर्गाला संस्कृत शिकवत आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केले आहे, असा दावा करण्यात आला. तेलंगणात काँग्रेसचा विजय होताच तिरंगा ध्वजावर कलमा लिहिला गेला, असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.

Fact Check: तेलंगणात काँग्रेसच्या विजयानंतर तिरंग्यावर कलमा लिहून मिरवणूक काढण्यात आली? जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल

तेलंगणात काँग्रेसचा विजय होताच भारताच्या ध्वजावर कलमा लिहिल्याचा दावा करत एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. झी न्यूजच्या डीएनए शोची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Fact Check: कर्नाटक सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केले आहे का? येथे वाचा सत्य

'कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने सर्व शाळांमध्ये कुराण शिकवणे बंधनकारक केले आहे.' असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Fact Check: केरळमधील शाळांमध्ये मंदिराचे पुजारी बनण्यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे का? येथे सत्य जाणून घ्या

केरळमधील मंदिरांमध्ये पुजारी पद मिळविण्यासाठी मुस्लिम शिक्षक मुस्लिमांच्या एका वर्गाला संस्कृत शिकवत असल्याचा दावा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून केला जात आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read