Saturday, November 23, 2024
Saturday, November 23, 2024

Yearly Archives: 2023

Fact Check: काश्मीर फाइल्सला मिळाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2023’? पाहुयात सत्य काय आहे

'दी काश्मीर फाईल्स' चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष उलटत आले तरीही या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होणे अध्याप थांबलेले नाही. सध्या पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेच्या झोतात आला आहे. यापूर्वी आपला चित्रपट ऑस्कर साठी शॉर्टलिस्ट झाल्याचा दिशाभूल करणारा दावा केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीच आता घोषणा केली आहे की हा चित्रपट #दादासाहेबफाळकेपुरस्कार२०२३ मध्ये "उत्कृष्ट चित्रपट" ठरला आहे.

Fact Check: मेहबूबा मुफ्ती यांचा सुमारे 7 वर्षे जुना फोटो दिशाभूल करीत व्हायरल

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पूजाअर्चा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरचा फोटो असे सांगत हा फोटो शेअर केला जात आहे.

बाजारात डुप्लिकेट चायना मेड अमूल बटर आले आहे? खोटा आहे हा दावा

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमूल कंपनीच्या 'बटर' या उत्पादनासंदर्भात आहे. बाजारात अमूल बटर डुप्लिकेट स्वरूपात आले आहे. मेड इन चायना बटर आले असून यापुढे खरेदी करताना काळजी घ्या. असे आवाहन हा दावा करतो.

वाराणसी फ्लायओव्हर कोसळल्याचा 2018 चा व्हिडिओ ठाण्यातील असल्याचा खोटा दावा व्हायरल

एका मोठ्या पिलर खाली चिरडलेली अनेक वाहने दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये युजर्स ही घटना 15 फेब्रुवारी रोजी ठाण्यात घडली असल्याचा दावा करत आहेत.

मुस्लिम टोपीमध्ये दिसणारे पंतप्रधान मोदींचे हे छायाचित्र एडिटेड आहे

नरेंद्र मोदींनी माहिती दिली आहे की, मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनानिमित्त कार्यक्रमाला ते उपस्थित होते. व्हायरल चित्रासारखाच एक फोटो या पोस्टमध्ये आहे.

मालवाहू गाडी बेपत्ता असल्याच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या खोट्या आहेत

नागपूरहून मुंबईला सुमारे ९० कंटेनर घेऊन जाणारी मालवाहू ट्रेन १२ ते १३ दिवसांपासून बेपत्ता आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्ग्यात हिंदू विधी केले का? मलंगगड दर्ग्याच्या संदर्भातील वादाबद्दल तुम्हाला हे सर्व माहित असणे आवश्यक आहे

महाराष्ट्रात आणि देशात सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दोन पाऊले पुढे गेले आहेत. "आता हिरव्या चादरीची नाही तर भगव्याची फॅशन आहे. मशीद, मजार आणि दर्ग्यालाही जावे लागले तर जय श्रीराम म्हणा

भेसळयुक्त दुधामुळे 2025 पर्यंत 87 टक्के भारतीयांना कर्करोग होईल का? सत्य जाणून घ्या

भारतात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त दुधामुळे 2025 पर्यंत 87 टक्के भारतीयांना कर्करोग होईल, असा धक्कादायक दावा सोशल मीडियावर केला जात आहे. दाव्यात ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कथित चेतावणीचा दाखला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Weekly Wrap: तुर्कीचा भूकंप ते भारताचे संसद भवन, मोदी पदवीधर आहेत की नाहीत पाहुयात या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

तुर्कीचा भूकंप सोशल मीडियावर अनेक फेक पोस्ट चा पाऊस पडला. संसदेत मोदींच्या भाषणावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाळ्या वाजविणे टाळले असा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. मोदी पदवीधर नाहीत म्हणून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचा फोटो वापरला नाही असे स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

लोकसभेत भाषणावेळी नितीन गडकरींनी पंतप्रधानांसाठी टाळ्या वाजवणं टाळलं? हे आहे सत्य

लोकसभेतील आभार प्रस्तावावर पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे टाळ्या वाजविणे टाळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read