Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: January, 2024

Fact Check: तलवारबाजी करणारी ही महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी नाहीत, व्हायरल व्हिडिओचे सत्य येथे जाणून घ्या

एका महिलेचा तलवारबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तलवारबाजी करणारी ही महिला राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी असल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे.

Fact Check: पोलिसांनी अटक करून युवकांना मारहाण केल्याच्या व्हिडिओचा मीरा रोडच्या हिंसाचाराशी संबंध नाही

मीरा रोड येथील नुकत्याच घडलेल्या घटनेशी जोडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये पोलीस काही लोकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. मात्र, आमच्या तपासणीत आम्हाला आढळून आले की हा व्हिडिओ मीरा रोड हिंसाचाराशी संबंधित नाही.

Fact Check: महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली असे राहुल गांधी म्हणाले? येथे जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून असा दावा केला जात आहे की, राहुल गांधी म्हणाले की, महात्मा गांधींना इस्लाममधून अहिंसेची प्रेरणा मिळाली.

Fact Check: अयोध्या राममंदिरात दानपत्र भरल्याच्या या व्हिडिओची सत्यता काय?

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने भाविक येत आहेत आणि दानाची हुंडी अर्थात दानपात्र तुडुंब भरले आहे, असा दावा करीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत आहे. अयोध्या राममंदिरात दानपत्र भरल्याच्या दाव्याची जोरदार सुरु आहे.

Weekly Wrap: अयोध्या राम मंदिराशी जोडलेल्या प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

२२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. या घटनेला जोडून अनेक खोटे दावे मागील आठवड्यात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. राम मंदिर उद्घाटनापूर्वी अयोध्येत ड्रोन शो आयोजित करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला. मेरीलँड, यूएसए मधील टेस्ला कार शोरूमच्या भारतीय मालकाने, राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी, टेस्ला म्युझिक शोचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 100 टेस्ला गाड्यांचा समावेश होता. असा दावा करण्यात आला. एक रामभक्त हातावर चालत अयोध्येला जात आहे. असा दावा करण्यात आला. मीरा भायंदर येथे पोलिसांनी रात्री घरात घुसून मारत बाहेर काढले. असा दावा एक व्हिडीओ शेयर करून करण्यात आला. वृंदावनच्या रस्त्यांवर भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदा यांनी राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले आहेत. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले? जाणून घ्या व्हायरल दाव्याचे सत्य

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाशी जोडणारा आणखी एक दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिवळ्या कपड्यात बसलेल्या एका महिलेच्या फोटोसह दावा केला जात आहे की, वृंदावनच्या रस्त्यावर भक्तांच्या चप्पलांची देखभाल करणाऱ्या यशोदेने राम मंदिरासाठी 51 लाख रुपये दान केले आहेत.

Fact Check: मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ जुना आहे

मीरा भायंदर मध्ये पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्याचे सांगणारा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार घिरट्या घालत आहे. X वर हा दावा करीत व्हिडीओ शेयर करण्यात आल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

Fact Check: हातावर चालणारा माणूस अयोध्येला निघालाय? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तेजीने व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की त्यात दिसणारी व्यक्ती हातावर चालत अयोध्येला जात आहे. इंडिया टीव्हीने 17 जानेवारी 2024 रोजी यूट्यूबवर शेअर केलेल्या 45 सेकंदांचा व्हिडिओमध्ये एक माणूस हातावर चालताना दिसत आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की भक्ताला श्रीरामाबद्दल प्रचंड उत्कटता होती आणि हात जोडून अयोध्येला निघाला.

भगवान रामाला समर्पित टेस्ला कारसह यूएस लाइट शो चे आयोजन शोरूमच्या मालकाने नव्हे तर VHP अमेरिकेने केले

मेरीलँड, यूएसए मधील टेस्ला कार शोरूमच्या भारतीय मालकाने, राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी, टेस्ला म्युझिक शोचे आयोजन केले होते, ज्यामध्ये 100 टेस्ला गाड्यांचा समावेश होता.

Weekly Wrap: भगवान राम आणि राम मंदिराशी निगडित दाव्यांचे फॅक्टचेक

येत्या २२ तारखेला अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यामुळे मागील आठवड्यात यासंदर्भात निगडित असंख्य दावे व्हायरल झाले. राम मंदिर स्थापन होण्याच्या खुशीने मोदी आणि योगी संपूर्ण भारताला ₹749 चे फ्री मोबाईल रिचार्ज देत आहेत, असा दावा करण्यात आला. श्रीराम आणि राममंदीरचे चित्र असलेली पाचशे रुपयांची नोट आली आहे, असा दावा करण्यात आला. बाबरी मशीद पाडविण्यात आलेली जागा भग्न अवस्थेत पडून आहे आणि अयोध्येत या जागेपासून तीन किलोमीटर दूर राम मंदिर उभारण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात जल्लोष करण्यासाठी फटाके वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याचा दावा करण्यात आला. काश्मीरच्या लाल चौकात रामाची प्रतिमा लावलेली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read