Tuesday, April 23, 2024
Tuesday, April 23, 2024

Yearly Archives: 2022

Weekly Wrap: कोविड हा आजारच नाही, कोरोनाबद्दल मेसेज करणे गुन्हा, एटीएम लूट रोखायची तर उलटा पिन मारा तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

मागील आठवड्यात सुरुवातीलाच टाटा कंपनी प्रत्येक भारतीयाला २९९९ रुपये देणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. एक फोटो शेयर करून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आईसोबतचा फोटो असल्याचा दावा करण्यात आला. कोविड हा आजारच नाही असा दावा खुद्द डॉक्टरांनी केला आहे किंवा कोरोना संदर्भात काहीही माहिती शेयर केल्यास तो गुन्हा ठरतो असे दावे व्हायरल झाले. लूट होत असल्यास एटीएम चा पिन उलटा घातल्यास लगेच पोलिसांना कळेल असा एक दावा पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

उलट क्रमाने एटीएम पिन टाकल्याने पोलिसांना सूचित केले जात नाही

एटीएम केंद्रावर लुटले जात असताना उलटा पिन वापरल्यास तात्काळ पोलिसांना सूचित करता येते आणि तशी यंत्रणा एटीएम मशीन मध्ये बसविण्यात आली आहे

कोविड-१९ हा आजार नाही का? येथे वाचा, व्हायरल दाव्याचे सत्य

कोविड-19 हा आजार नाही हे जगभरातील डॉक्टरांनी मान्य केले आहे, असा दावा करत एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

हा फोटो अटलबिहारी वाजपेयींच्या बालपणीचा नाही, खोटा दावा पुन्हा व्हायरल

25 डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 98 वा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये एक महिला एका मुलासोबत दिसत आहे. हा अटलबिहारी वाजपेयी यांचा बालपणीचा फोटो असून ती महिला त्यांची आई असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यासह हजारो लोकांनी फोटो शेअर केला आहे.

व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये कोविड-संबंधित कोणतीही माहिती शेयर करणे दंडनीय आहे? व्हायरल मेसेजमागील सत्य हे आहे

हिंदीतील एक व्हायरल संदेश, गृह मंत्रालयाच्या प्रधान सचिवांनी पाठविला आहे असे सांगून मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. सोशल मीडिया/व्हॉट्सअप ग्रुप्सवर कोरोनाव्हायरसशी संबंधित कोणतीही माहिती शेयर करण्यासंदर्भात चेतावणी देणारा हा संदेश आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, भारतात चिंता वाढत आहे, अशावेळी हा संदेश केवळ सरकारी एजन्सी कोरोनाव्हायरसबद्दल पोस्ट करू शकतात आणि या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यास संपूर्ण (सोशल मीडिया) ग्रुप सदस्यांसह, आयटी कायद्यांतर्गत शिक्षा केली जाईल. असे हा संदेश सांगतोय.

टाटा कंपनी देशवासियांना 2,999 रुपये मोफत देत आहे का? येथे सत्य जाणून घ्या

टाटा कंपनी देशवासियांना 2999 रुपये मोफत देत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

Weekly Wrap: नवीन वर्षाची चमत्कारिक वैशिष्ठये, कोरोनाचा कहर, तसेच या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

२०२३ हे नवीन वर्ष अनेक चमत्कारिक वैशिष्ठये घेऊन आले आहे. हा दावा या आठवड्यात गाजला. चीन पाठोपाठ भारतातही कोरोनाचा नवा व्हेरियंट कहर करणार असा दावा करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. भारत सरकार २००० च्या नोटा बंद करणार आहे असा एक दावा व्हायरल झाला. प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान मोदींनी १० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे असा संदेश पसरला होता. रेल्वे स्थानकावर थांबलेल्या एका टीसी चा शॉक लागून मृत्यू झाल्याचा दावा व्हायरल झाला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

भाजप नेते आशिष शेलार यांना खजूर भरविणारा याकूब मेमन चा भाऊ नाही

भाजप नेते आणि मुंबई भाजप चे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या बद्दल मागील तीन महिन्यांपासून एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका फोटोत आशिष शेलार बसलेले असून त्यांना एक व्यक्ती खजूर भरवीत आहे. या फोटोवर "आशिष शेलार यांना हिंदुत्वाचा घास भरविताना याकूब मेमन चा भाऊ" अशी कॅप्शन घालण्यात आली आहे. व्हाट्सअप आणि फेसबुक च्या माध्यमातून ही पोस्ट मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे.

XBB व्हेरिएंटवर व्हायरल व्हाट्सअप फॉरवर्डला काही आधार नाही

व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की "कोविड- ओमिक्रॉन एक्सबीबी हा नवीन व्हायरस डेल्टा प्रकारापेक्षा 5 पट जास्त विषाणूजन्य आहे आणि त्याचा मृत्यू दर जास्त आहे". पुढे मेसेज सांगतो की, "नवीन XBB प्रकाराच्या लक्षणांमध्ये खोकला किंवा ताप यांचा समावेश नाही परंतु मर्यादित संख्येत सांधेदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, मानदुखी आणि न्यूमोनिया ही त्याची लक्षणे असतील."

२०२३ ची ही वैशिष्ठये खरी आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे

नवीन वर्षात प्रत्येक महिन्यात एका विशिष्ठ तारखेला शुक्रवार येणार, या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक वार चारवेळा येणार असल्याने हा महिना वेगळा ठरणार आणि असे वेगळेपण यानंतर ८२३ वर्षांनी पाहायला मिळणार

CATEGORIES

ARCHIVES

Most Read