Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: July, 2023

Weekly Wrap: सुपरस्टार जितेंद्रचे निधन, रेल्वेने बदलले नियम, दिल्लीचे रस्ते रक्ताने लाल तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फेक न्यूजची बरसात झाली. फ्रान्स येथे उसळलेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर अनेक असंबंध दावे करण्यात आले. सुपरस्टार जितेंद्रचे निधन झाले आहे, असा एक दावा करण्यात आला. भारतीय रेल्वेने आपल्या नियमात बदल केले असून ते 1 जुलै पासून लागू करण्यात आल्याचा दावा झाला. बकरी ईद ला कुरबानी दिल्यामुळे दिल्ली येथील रस्ते रक्ताने लाल झाल्याचा दावा करण्यात आला. भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी काझीच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्याचा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

फ्रान्समधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर, जुने आणि संबंध नसलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पोलिसांद्वारे किशोरवयीन मुलाच्या हत्येवरून फ्रान्समध्ये व्यापक अशांतता पसरली असताना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स या देशात मोठ्या प्रमाणात दंगल दर्शविण्याचा दावा करणार्‍या व्हिज्युअलने व्यापलेले आहेत. न्यूजचेकरने अशा चार व्हिडिओंची तपासणी केली आणि ते खोट्या संदर्भाने शेअर केले गेले असल्याचे आढळले.

Fact Check: भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा ईदनिमित्त शुभेच्छा देतानाचा 4 वर्षे जुना व्हिडिओ, अलीकडच्या काळातला म्हणत व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी काजी यांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check: अभिनेते जितेंद्र शास्त्री यांच्या निधनाची जुनी बातमी दिशाभूल करीत व्हायरल

बॉलीवूड सुपरस्टार जितेंद्र यांचे निधन झाले, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांना अश्रू अनावर झाल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली जात आहे.

Fact Check: बकरीदच्या निमित्ताने व्हायरल झालेला हा व्हिडिओ दिल्लीचा नसून बांगलादेशचा आहे

दिल्लीशी जोडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका सोसायटीचा आहे जिथे रस्त्यावर लाल रंगाचे पाणी तुंबले आहे. लोक या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहित आहेत, “ईद का नज़ारा। आज तो दिल्ली के कुछ इलाक़ों में नल से भी क़ुर्बानी का ख़ून आ रहा है।कुछ फैशनेबल कपड़े भी रंगें जा सकते हैं।”. या कॅप्शनसह हा व्हिडिओ फेसबुकवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Fact Check: 1 जुलैपासून सुधारित 10 रेल्वे नियम होणार लागू? नाही, खोटा जुना दावा पुन्हा व्हायरल

भारतीय रेल्वेने आपल्या 10 नियमात नवे बदल केले आहेत. हे नियम 01 जुलैपासून लागू होणार आहेत. असा दावा सध्या एका भल्यामोठ्या टेक्स्ट च्या माध्यमातून व्हाट्सअपवर केला जात आहे. अनेकजण हा व्हाट्सअप फॉरवर्ड शेअर करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

सावधान! गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हे स्कॅम आहे

गुलाबी रंगाचे व्हाट्सअप हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून विविध ग्रुपवर आणि पर्सनल चॅटवर हा मेसेज जोरदार पसरत आहे. गुलाबी अर्थात Pink Whatsapp हे व्हाट्सअप चे नवे फिचर आले असून यासंदर्भात योग्य ते अपडेट मिळविण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा असे व्हायरल मेसेज सांगतो. अनेक युजर्स हा मेसेज मोठ्याप्रमाणात शेयर करीत आहेत. विशेषतः हा मेसेज स्कॅम चा भाग असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर आहे. यापार्श्वभूमीवर Pink म्हणजेच गुलाबी व्हाट्सअप चा नेमका प्रकार काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एक्सप्लेनर च्या माध्यमातून करणार आहोत.

Weekly Wrap: समान नागरी कायद्यासाठी मिस्ड कॉल मोहीम, तरुणीवर जिहाद्याचा हल्ला, कुत्र्याचे मांस सापडले आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

विविध व्हायरल दाव्यान्नी मागील आठवड्यातही धुमाकूळ घातला. पुण्यात एका हिंदू तरुणीवर मुस्लिमाने जीवघेणा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर कुत्र्यांचे मांस पकडण्यात आले आहे, असा एक दावा झाला. समान नागरी कायद्यासाठी समर्थन देण्यास एका क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले. कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या मोफत बससेवा योजनेचा लाभ घेताना एका महिलेला हात गमवावा लागला, असा दावा झाला. जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रवेश देण्यापासून रोखले असा दावा झाले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्ट मध्ये पाहता येतील.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read