Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

Monthly Archives: March, 2023

Fact Check: महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन सरकारने दिलंय? जाणून घ्या सत्य काय आहे

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी मिटविण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे, अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. असा दावा करणाऱ्या पोस्ट सध्या पाहायला मिळाल्या आहेत.

Fact Check: पीएम मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे ‘प्रबळ दावेदार’? अस्ले तोजेला केंद्रीभूत व्हायरल दाव्याचे सत्य हे आहे

नोबेल समितीचे उपनेते Asle Toje यांनी पंतप्रधान मोदींना नोबेल शांतता पुरस्काराचे "प्रबळ दावेदार" म्हणून घोषित केल्याच्या "बातमीने" बुधवारी उशिरापासून भारतातील मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडिया इकोसिस्टममध्ये एक तुफान आले. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स, CNBC-TV18, OpIndia आणि लोकमत यासह प्रमुख वृत्तपत्रांनी भारतीय पंतप्रधानांवरील तोजे यांच्या कथित विधानाची बातमी प्रसिद्ध केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली.

Fact Check: चीनमध्ये पडला ‘अळ्यांचा पाऊस’? व्हायरल व्हिडिओमागील सत्य येथे जाणून घ्या

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. पार्क केलेल्या गाड्यांचे रूफ आणि बोनेट्सवर अळ्यासदृश्य दिसणाऱ्या गोष्टी त्यात आढळतात. काहींनी हा प्रकार चीनच्या बीजिंग मध्ये घडल्याचा दावा करीत आहेत. काहींनी लायनिंग प्रांतात 'अळ्यांचा पाऊस' पडल्याचा दावा केला आहे. अनेक युजर्सनी या घटनेला आश्चर्यकारक म्हटले असून चिनी अधिकाऱ्यांनी स्थानिकांना आश्रय देण्याची शिफारस केली आहे.

Fact Check: योगविद्या आणि साधनेच्या जोरावर तामिळनाडू येथील तरुण आकाशात उडतो? व्हायरल दावा खोटा असल्याचे उघड

तामिळनाडू मध्ये राहणारा एक युवक आकाशात उडू शकतो, असा दावा एक व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या युवकाने योगविद्या आणि साधनेच्या जोरावर हे शक्य करून दाखविले आहे. वैज्ञानिक आणि शास्रज्ञ देखील यामुळे हैराण झाले आहेत. पवनपुत्र हनुमान आणि रामचरित मानस ला काल्पनिक म्हणणाऱ्यांना हे खुले आव्हान आहे. असे दावे मागील वर्षभरापासून जोरदारपणे केले जात आहेत. ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

Fact Check: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू ना प्रधानमंत्री म्हटलं? अर्धा व्हिडीओ शेयर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख प्रधानमंत्री असा केला आहे. असा दावा एक व्हिडीओ शेयर करून केला जात आहे. " ब्रकिंग न्युज एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी केली. प्रधानमंत्री पदावर द्रोपदी मुर्मू यांची नुकतीच निवड करण्यात आली. @mieknathshinde उगच बाळासाहॆबांची दिघॆ साहॆबांची इज्जत नका काढू" अशा कॅप्शन खाली हा दावा व्हायरल केला जात आहे.

Fact Check: वाराणसीमध्ये होळीच्या दिवशी परदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हायरल होणारा व्हिडिओ आहे ३ वर्षे जुना

वाराणसीमध्ये होळीच्या दिवशी काही मुलांनी एका परदेशी महिलेशी गैरवर्तन आणि लैंगिक अत्याचार केल्याचा दावा करीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावरील काही मुले मुलीला घेरून तिच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहेत.

Fact Check: युपीमध्ये जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याची तुकडे करून झाली हत्या? व्हायरल दाव्याला काहीच आधार नाही

देवरिया जिल्ह्यात हिंदू मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुस्लिम तरुणाच्या हत्येची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "उत्तर प्रदेशातील देवरिया भागातील मौ. गफ्फार नावाचा जिहादी काल एका हिंदू मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात जामिनावर बाहेर आला. आज अज्ञात व्यक्तीने गफ्फार मियांचे ५ तुकडे केले आणि नाल्यात फेकून दिले!" असे हा व्हायरल दावा सांगतो. यासंदर्भातील हिंदी भाषेतील दावा आम्हाला ट्विटर वर पाहायला मिळाला.

Fact Check: कसबा पोटनिवडणुकीत पराभवानंतर नितीन गडकरींनी भाजपाला दिला घरचा आहेर? खोटा आहे हा दावा

महाराष्ट्राच्या पुणे येथील कसबा पोटनिवडणूक महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजली आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या नावे एक पोस्ट व्हायरल होत आहे. "फडणवीस नी एकनाथ शिंदे घेऊन मोठी चुक केली आहे का... नितिन गडकरी साहेब घरचा आहेर भेटायला सुरवात झाली" अशा कॅप्शन खाली ही पोस्ट केली जात असून या बरोबरीने नितीन गडकरी यांचा फोटो असलेले एक पोस्टरही जोडले जात आहे.

Explainer: जाणून घेऊया काय आहे H3N2 व्हायरस आणि या आजारात आयएमए अँटीबायोटिक्स न वापरण्यास का सांगत आहे?

कोरोनाचे संकट देशासमोर आव्हान उभे करणारे ठरले. या संकटातून देश बाहेर पडतोय तोच आता H3N2 या नव्या फ्लूच्या रुग्णसंख्येत देशभरात वाढ होत आहे. देशभरातील रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी भरून जात आहेत. ताप, सर्दी, खोकला आणि फुफ्फुसाच्या आजारांनी रुग्णांना बेजार करून सोडले आहे. हा आजार संशोधकांच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय ठरला आहे. या आजाराचे स्वरूप काय आहे, त्याची लक्षणे कशी आहेत? आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी काय आहे? यासंदर्भातील माहिती आपण या एक्सप्लेनर च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Weekly Wrap: अवघड जागी संजय राऊतांचे टॅटू, उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाला भाऊ म्हटले किंवा काँग्रेसने वाटली सोनसाखळी तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

खासदार संजय राऊत यांचा टॅटू एका कार्यकर्त्याने आपल्या खासगी ठिकाणी काढून घेतल्याचा दावा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेब याला आपला भाऊ म्हटले असा एक दावा करण्यात आला. काँग्रेसने छत्तीसगढ येथे झालेल्या आपल्या महाअधिवेशनात सर्व महनीय नेत्यांना सोनसाखळी घालून स्वागत केले असा दावा करण्यात आला. तसेच कुतुबमिनार चा भाग असल्याचे सांगून एक फोटो व्हायरल करण्यात आला.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read