Saturday, November 23, 2024
Saturday, November 23, 2024

Yearly Archives: 2023

Fact Check: युपीमध्ये जामिनावर सुटलेल्या बलात्काऱ्याची तुकडे करून झाली हत्या? व्हायरल दाव्याला काहीच आधार नाही

देवरिया जिल्ह्यात हिंदू मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुस्लिम तरुणाच्या हत्येची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "उत्तर प्रदेशातील देवरिया भागातील मौ. गफ्फार नावाचा जिहादी काल एका हिंदू मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात जामिनावर बाहेर आला. आज अज्ञात व्यक्तीने गफ्फार मियांचे ५ तुकडे केले आणि नाल्यात फेकून दिले!" असे हा व्हायरल दावा सांगतो. यासंदर्भातील हिंदी भाषेतील दावा आम्हाला ट्विटर वर पाहायला मिळाला.

Fact Check: कसबा पोटनिवडणुकीत पराभवानंतर नितीन गडकरींनी भाजपाला दिला घरचा आहेर? खोटा आहे हा दावा

महाराष्ट्राच्या पुणे येथील कसबा पोटनिवडणूक महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजली आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या नावे एक पोस्ट व्हायरल होत आहे. "फडणवीस नी एकनाथ शिंदे घेऊन मोठी चुक केली आहे का... नितिन गडकरी साहेब घरचा आहेर भेटायला सुरवात झाली" अशा कॅप्शन खाली ही पोस्ट केली जात असून या बरोबरीने नितीन गडकरी यांचा फोटो असलेले एक पोस्टरही जोडले जात आहे.

Explainer: जाणून घेऊया काय आहे H3N2 व्हायरस आणि या आजारात आयएमए अँटीबायोटिक्स न वापरण्यास का सांगत आहे?

कोरोनाचे संकट देशासमोर आव्हान उभे करणारे ठरले. या संकटातून देश बाहेर पडतोय तोच आता H3N2 या नव्या फ्लूच्या रुग्णसंख्येत देशभरात वाढ होत आहे. देशभरातील रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी भरून जात आहेत. ताप, सर्दी, खोकला आणि फुफ्फुसाच्या आजारांनी रुग्णांना बेजार करून सोडले आहे. हा आजार संशोधकांच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय ठरला आहे. या आजाराचे स्वरूप काय आहे, त्याची लक्षणे कशी आहेत? आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी काय आहे? यासंदर्भातील माहिती आपण या एक्सप्लेनर च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Weekly Wrap: अवघड जागी संजय राऊतांचे टॅटू, उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाला भाऊ म्हटले किंवा काँग्रेसने वाटली सोनसाखळी तसेच इतर प्रमुख फॅक्टचेक

खासदार संजय राऊत यांचा टॅटू एका कार्यकर्त्याने आपल्या खासगी ठिकाणी काढून घेतल्याचा दावा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेब याला आपला भाऊ म्हटले असा एक दावा करण्यात आला. काँग्रेसने छत्तीसगढ येथे झालेल्या आपल्या महाअधिवेशनात सर्व महनीय नेत्यांना सोनसाखळी घालून स्वागत केले असा दावा करण्यात आला. तसेच कुतुबमिनार चा भाग असल्याचे सांगून एक फोटो व्हायरल करण्यात आला.

Fact Check: भूपेश बघेल यांनी सोन्याच्या माळा घालून काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले का? हा दावा खोटा आहे

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या ८५व्या महाअधिवेशनातील मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून सोनसाखळी घालून स्वागत करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check: उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटले? येथे वाचा सत्य

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबचा भाऊ असा उल्लेख केल्याचा दावा शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे औरंगजेबच्या शौर्याचे कथन करताना म्हणतात, “जर मी आता म्हणालो की तो माझा भाऊ होता, तर तुम्ही म्हणाल की त्याचे नाव काय होते ते तुम्हाला माहीत आहे? मी औरंगजेब असे सांगेन. तो धर्माने मुस्लिम असेल, पण त्याने आपल्या देशासाठी बलिदान दिले."

Fact Check: हा व्हायरल फोटो कुतुबमिनारच्या लोखंडी स्तंभाचा आहे का?

सोशल मीडियावर लोखंडी खांबाचा एक फोटो व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की चित्रात दिसणारा स्तंभ हा मुघलांनी बांधलेल्या कुतुब मिनारमध्ये स्थापित केलेल्या प्रसिद्ध लोखंडी स्तंभाचा आहे, ज्यावर मुघलांच्या पूर्वजांची नावे कोरलेली आहेत.

Fact Check: शिवसेना कार्यकर्त्याने आपल्या खासगी अवयवावर संजय राऊत यांचा टॅटू काढला? एडिटेड आहे तो फोटो

पाठीवर टॅटू काढलेल्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा टॅटू त्या व्यक्तीच्या पाठीवर तर संजय राऊत यांचा टॅटू खालच्या बाजूला खासगी अवयवावर बनवल्याचे चित्रात दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स दावा करत आहेत की त्या व्यक्तीने संजय राऊत यांचा टॅटू त्या खालच्या भागावर काढला आहे.

Weekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार, मेहबुबा मुफ्तीची मूर्तिपूजा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडाही सोशल मीडियावर होणाऱ्या अनेक फेक दाव्यानी गाजला. वाराणसी येथे पडलेल्या जुन्या फ्लायओव्हरच्या पिलरचा व्हिडीओ शेअर करून तो पिलर ठाणे येथे पडला असा दावा करण्यात आला. बाजारात अमूल बटरचे चायना मेड उत्पादन आले आहे, असा दावा झाला. उत्तरप्रदेश सरकारने गांजा ओढणाऱ्यांना नोकरीची संधी दिली आहे. जम्मू काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आता मूर्तिपूजा सुरु केली आहे. आदी दाव्यान्नी चर्चा घडविली. काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला हा दावाही मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक आपल्याला या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

Fact Check: यूपी सरकारने गांजा ओढणाऱ्यांसाठी व्हेकेन्सी काढली आहे का? येथे सत्य वाचा

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे ज्यात दावा केला आहे की यूपीमध्ये गांजा ओढणाऱ्यांसाठी नोकरी आली आहे, ज्यामध्ये त्यांना 80 लाखांहून अधिक पगार मिळेल.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read